आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रारुप रचना:पहिल्या दिवशी एकही हरकत नाही ; जि.प. प्रारुप रचना हरकतीसाठी शनिवार, रविवारीही कार्यालय सुरू राहणार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या जिल्हा परिषदेच्या गट व गणांच्या प्रारूप आराखड्यामुळे गट व गणांच्या रचनेत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. त्यामुळे बहुतांश गट व गणांमधील राजकीय परिस्थिती बदलणार आहे. हरकतीनंतर गट रचना अंतिम होणार आहे, असे असले तरी, अद्याप आरक्षणही जाहीर झालेले नाही; मात्र गावंाची संख्या बदलली असल्यामुळे तेथील प्रस्थापितांच्या राजकारणाला धक्का बसणार असल्याने त्यांची चिंता वाढली आहे. आपले अस्तित्व टिकविण्यासाठी प्रस्थापितांना अन्य गटांमध्ये आपले नशिब आजमावावे लागणार आहे. गटरचना जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागात हरकती दाखल करण्यासाठी गर्दी हाेत आहे; शुक्रवारी पहिल्या दिवशी एकही हरकत दाखल झाली नाही. हरकतीसाठी शनिवार व रविवार सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू राहणार आहे. जिल्हा परिषदेत अनेक वर्षांच्या प्रशासकीय कारकीर्दीनंतर तब्बल ३० वर्षांनी गट रचनेत बदल झाला आहे. मध्यंतरी एखाद दुसरा गट व गण वगळता बहुतांश गट कायम होते. १९९२ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी गट व गणांच्या रचनेत बदल करण्यात आले होते. २०११च्या जनगणनेनुसार गट व गण वाढविण्यात आले आहे.

दिग्गजांचे गट बदलले; तर अनेकांना दिलासा गट बदलेल्यांमध्ये प्रामुख्याने माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, सदस्य पवन सोनवणे यांच्यासह अन्य काही दिग्गजांचा समावेश आहे. लालचंद पाटील यांचा नशिराबाद गट नगरपरिषद झाल्याने त्यांचा भादली बु, कुसुंबा असा झाला आहे. यासह काही गावेही बदलली आहेत. असे असले तरी अजून आरक्षणानंतरच त्याची उमेदवारी ठरणार आहे. पवन सोनवणे यांचे मोहाडी गाव भादली गटात गेल्याने त्यांची अस्वस्थता वाढली आहे. याबाबत सोनवणे यांनी हरकत घेतली असून ते शुक्रवारी वकिलांसह ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाले होते. भौगोलिक क्षेत्रानुसार हा बदल चुकीचा असून दोन दिवसात हरकत दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगतिले. आव्हाणे गणातील माजी सदस्य अॅड. हर्षल चौधरी यांचे गाव हे ममुराबादला जोडले आहे. या बदलावर त्यांचीही हरकत असून आपण ती दाखल करणार असल्याचे चाैधरी यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष व माजी शिक्षण सभापतींना दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...