आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज दाखल:खडसेंबाबत सर्वपक्षीय पॅनलसाठी अटी नकाेत; डाॅ. सतीश पाटलांचा प्रस्ताव

जळगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलचा पायंडा कायम ठेऊन सहकारी संस्थेत राजकीय संघर्ष टाळणे संस्थेच्या हिताचे आहे. काेणत्याही राजकीय अटीशर्ती न ठेवता सर्वांनी एकत्रित येण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीचे माजी मंत्री डाॅ. सतीश पाटील यांनी शिंदे सेनेचे आमदार किशाेर पाटील यांना दिला. दूध संघात दाेन्ही उमेदवारांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. याचवेळी ही चर्चा झाली.

दूध संघाच्या निवडणुकीत भाजप-शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अशा पॅनलची तयारी सुरू आहे. आमदार खडसे वगळता सर्वपक्षीय पॅनल अशी घाेषणा भाजपने केली हाेती. त्यामुळे ही चर्चा थांबली हाेती. दरम्यान, बुधवारी डाॅ. सतीश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शिंदेसेनेचे आमदार किशाेर पाटील यांच्याशी चर्चा केली. राजकीय अटी-शर्ती न ठेवता सर्वांनी एकत्रित आल्यास ही निवडणूक बिनविराेध हाेऊ शकते, अशी भूमिका घेतली. या वेळी दूध संघाचे संचालक माजी खासदार अॅड. वसंतराव माेरे, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, रावसाहेब पाटील उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...