आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आवाज 100 डेसीबलपेक्षा जास्तत; बँडबाजावर एका दिवसासाठी 60 हजार ते दीड लाखापर्यंत केला जातोय खर्च

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नसमारंभात आता संगीत रजनी, हळदीच्या दिवशीचा डीजे लावण्याची क्रेझ वाढली आहे. इतर जिल्ह्यांमधून ६० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत भाडे खर्च करून बँडपथक मागवले जात आहेत. दरम्यान, ध्वनिप्रदूषणाच्या सर्व मर्यादा ओलांडून वाजवल्या जाणाऱ्या डीजे, बॅँडवर वर्षाकाठी पाच ते सात ठिकाणी कारवाई केली जाते. कोरोळा काळात लग्नासह इतर समारंभावर प्रचंड निर्बंध लादण्यात आले होते.

आता पूर्णपणे निर्बंध हटवल्याने लोक लग्नात एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये आहेत. डीजे आणि बँडवर सर्वाधिक खर्च केला जातो आहे. जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात असलेला बँड, डीजेला सर्वाधिक पसंती दिली जाते आहे. सुमारे ६० हजार रुपयांपासून दोन दिवसांसाठी बँड उपलब्ध होतो आहे. हळदीच्या रात्री चार तासांसाठी १० ते ५० हजार रुपयांपर्यंत डीजेचे भाडे मोजावे लागते आहे.

चित्रपटांमध्ये दाखवत असलेल्या पद्धतीप्रमाणेच आता सामान्य लोकदेखील संगीत संध्याचा आनंद घेतात. लग्नातील इतर महत्त्वाच्या बाबींसोबतच आता डीजेवर खर्च केला जातो आहे. जळगाव जिल्ह्यात धुळे, सटाणा, येवला, कापडणे, मालेगाव येथील प्रसिद्ध बँड बोलावले जातात. सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत भाडे खर्च करून हे बँड उपलब्ध होतात. शिवाय लग्नाच्या दोन-तीन महिने आधीच अॅडव्हान्स देऊन हे बँड बुक करावे लागत आहेत.

बातम्या आणखी आहेत...