आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पाठीमागील ईडीचा ससेमिरा सुरूच आहे. गेल्या वर्षी जप्त केलेली पावणेसहा कोटी रुपयांची मालमत्ता दहा दिवसांत सोडावी, अशी नाेटीस ईडीने पाठवली आहे. खडसेंनी नाेटीस मिळाल्याच्या वृत्ताला दुजाेरा दिला आहे.
भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहाराच्या आरोपानंतर ईडीकडून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंविरुद्ध कारवाईला सुरुवात केली होती. गेल्या वर्षी ईडीने खडसेंना नाेटीसदेखील बजावली होती. या नाेटिसीनंतर ऑगस्ट महिन्यात खडसेंची जळगाव व लोणावळा येथील ५ कोटी ७५ लाख रुपयांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली होती. या प्राॅपर्टीमध्ये भाडेकरू असल्यास अथवा स्वत: निवास असल्यास दहा दिवसांत खाली करण्यासंदर्भात नाेटीस बजावली आहे.
दरम्यान, आपल्या नावावर एकच प्लाॅट आहे. त्यावर बांधकामदेखील झालेले नाही. त्यामुळे रिकामा करून देण्याची गरज नसल्याचे खडसेंनी सांगितले. दरम्यान, खडसेंसह आणखीही काही जणांना ईडीने नोटीस बजावल्याचे बोलले जात आहे. पण अद्यापी ती नावे समोर आली नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.