आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पाेषण शक्ती निर्माण करण्यासाठी आता प्रत्येक विद्यार्थ्यावर दिवसाला 5.45 रुपये खर्च हाेणार

जळगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनंेतर्गत प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना आहाराचा पुरवठा करण्यास व त्यासाठी सुधारित दरास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यासाठी प्राथमिक शाळेतील प्रति विद्यार्थ्याला प्रतिदिन ५.४५ तर उच्च प्राथमिकसाठी ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहारासाठी ८.१७ रुपये खर्च करण्यात येणार आहे.

योजनंेतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीमधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच इयत्ता सहावी ते आठवीमधील उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येताे. योजनंेतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रतिविद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो. केंद्र शासनाने अन्न शिजवण्याच्या दरात १०.९९ टक्के वाढ करण्याचे निर्देश दिलेले होते. त्यानुसार अन्न शिजवण्याच्या दरासाठी प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी ४.९७ व उच्च प्राथमिक वर्गासाठी ७.४५ याप्रमाणे निश्चित केली होती. २०२२-२३ या आर्थिक वर्षात अन्न शिजवण्याच्या दरात ९.६ टक्के दरवाढ मंजूर केेली आहे.

असा करण्यात येणार आहारावर खर्च; शहरी भागामध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली {प्राथमिकसाठी आहारावर ५.४५ रुपये, धान्यादी माल पुरवण्याचा खर्च ३.३७ रुपये तर इंधन, भाजीपाल्यासाठी २.८ रुपये खर्च करण्यात येणार आहे. { उच्च प्राथमिक विद्यार्थ्यासाठी आहार ८.१७, धान्यादी माल पुरवण्यासाठी ५.६ तर इंधन व भाजीपाल्यासाठी ३.११ रुपये खर्च करण्यात येणार आहे. { या योजनेत शहरी भागात मनपा, नगरपालिका क्षेत्रात स्वयंसेवी संस्था, बचत गटामार्फत शिजवलेल्या तयार आहाराचा पुरवठा विद्यार्थ्यांना हाेताे. { शहरात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली आहे. त्यामुळे प्राथमिक गट ५.४५ तर उच्च प्राथमिकसाठी ८.१७ रुपये आहार खर्च करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...