आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिव्हिल डॉक्टरांची सुटका:आता शवविच्छेदनाची जबाबदारी सिव्हिल ऐवजी जीएमसीच्या डॉक्टरांची, यासाठी दहा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आता न्यायवैद्यकशास्त्र विभागातंर्गत जीएमसीच्या डॉक्टरांची शवविच्छेदन अर्थात पीएम करण्याकरिता ड्युटी लावण्यात येणार आहे. बुधवारी हा बदल करण्यात आला. आतापर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयांच्या डॉक्टरांची यासाठी ड्युटी लावण्यात येत होती. दरम्यान याकरिता जीएमसीत दहा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्यात करार करण्यात आला आहे. जीएमसीत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर देखील उसनवारी तत्वावर काम करत आहे. शवविच्छेदनाची संपूर्ण जबाबदारी ही न्यायवैद्यकशास्त्र विभागाच्या डॉक्टरांची आहे. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाकडे दोनच डॉक्टर असल्याने याठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी यांची ड्युटी लावण्यात येत होती.

दररोजचे काम सांभाळून पुन्हा पीएमची ड्युटी करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यातच या विभागातील अधिक माहिती नसल्याने अनेकदा न्यायालयात देखील उत्तरे देताना त्रास होत असे, हा ताण कमी करावा याकरिता सिव्हिलच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना निवेदन दिले. यावर त्यांनी नवीन भरती करत जीएमसीच्या डॉक्टरांच्या ड्युटी लावण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यानुसार बुधवारी हे बदल करण्यात आले असून पंधरा दिवसांचे शेड्युल तयार करण्यात आले आहे. यात नवीन रुजू झालेल्या 3 महिला व 7 पुरुष डॉक्टरांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...