आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंत्राची निर्मिती:आता सायकलीच्या पेडलवर चालणार वाॅटर प्युरिफायर; एका मिनिटाला तीन लिटर पाणी फिल्टर करण्याची आहे क्षमता

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे यंत्र विभागाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सायकलच्या पेडलचा वापर करून वॉटर प्युरिफायर बनवले आहे. या मुळे ज्या ठिकाणी विद्युत पुरवठा नाही अशा ठिकाणी नागरिकांना या यंत्राचा वापर करता येणे सहज शक्य होईल. वीज बचतीचा उद्देशही त्यातून साध्य हाेऊ शकेल.

महाविद्यालयातील अभिनीत भावसार, दीपक शुक्ला, मिहीर चौधरी आणि वर्षा पाटील या विद्यार्थ्यांनी या यंत्राची निर्मिती केली आहे. सामान्यतः वॉटर प्युरिफायर चालवण्यासाठी विजेचा उपयोग केला जातो. परंतु, काही दुर्गम भागात जिथे विद्युत पुरवठा पोहचू शकत नाही, अशा ठिकाणी हे यंत्र खूप उपयोगी पडू शकते. या यंत्रात पेडलद्वारे मिळणाऱ्या मानवीय ऊर्जेचा उपयोग करून त्याचे विद्युत ऊर्जेत रुपांतर केले जाते व ती ऊर्जा बॅटरीत साठवली जाते. संचित ऊर्जेचा गरजेनुसार वापर करून त्यावर वॉटर प्युरीफायर चालवले जाते. या वॉटर प्युरिफायरची क्षमता एका मिनिटाला दाेन ते तीन लिटर पाणी फिल्टर करण्याएवढी आहे. बॅटरी एक वेळ संपूर्ण चार्ज केल्यावर त्याद्वारे फिल्टर सलग तीन ते चार तास काम करू शकते. या प्रकल्पाची आखणी आणि बांधणी करताना विद्यार्थ्यांना प्रा. किशोर महाजन, विभागप्रमुख प्रा. तुषार कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...