आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी आता एक दिवस आधी अर्ज करण्याची मिळेल संधी

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक‎ शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या‎ लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर‎ केले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना‎ एक मार्चपर्यंत परीक्षेसाठी अर्ज‎ दाखल करता येणार आहे. इच्छुक‎ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज दाखल‎ करावे, असे आवाहन शिक्षण‎ विभागाने केले आहे. सध्या प्रवेश‎ अर्ज दाखल करण्यासाठी ४९‎ दिवसांचा कालावधी उरला आहे.‎ ‎

बोर्डाच्या वेळापत्रकानुसार २१‎ फेब्रुवारी ते २१ मार्च बारावी आणि २‎ ते २५ मार्च या कालावधीत‎ दहावीच्या परीक्षा होणार आहेत.‎ फॉर्म भरण्याची प्रक्रिया अद्यापही‎ सुरू आहे. राज्य परीक्षा मंडळाने‎ लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक‎ जाहीर केले आहे. मात्र, अद्यापही‎ प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर‎ केलेल्या नाहीत. अतिविशेष विलंब‎ शुल्कासह दहावीच्या विद्यार्थ्यांना १३ फेब्रुवारी ते १‎ मार्चपर्यंत परीक्षा फॉर्म भरता येईल.

‎ बारावीसाठी ४ ते २० फेब्रुवारीपर्यंत‎ अर्ज करता येईल.‎ विद्यार्थी-पालकांनी अधिक‎ माहितीसाठी https://‎www.mahasscboard.in या‎ संकेतस्थळावर भेट द्यावी.‎ ‎ दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिविशेष‎ विलंब शुल्कासह १३ फेब्रुवारी ते १‎ मार्चपर्यंत परीक्षा फॉर्म भरता येईल.‎ बारावीसाठी ४ ते २० फेब्रुवारीपर्यंत‎ अर्ज करता येईल.‎ https://‎ www.mahasscboard.in या‎ संकेतस्थळावर भेट द्यावी, असे सूचित करण्यात आलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...