आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वापरात येणार:एनआरएचएमची ‘ती’ इमारत वापरात येणार; सुरक्षारक्षक नेमणार : जिल्हा परिषद सीईओ

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराबाहेर असलेली गैरसोयीची ठरलेली नवीन शासकीय इमारत वापराविना पडून आहे. याबाबत तातडीने माहिती घेऊन ही इमारत शासकीय कामासाठी वापरात आणणार असून, त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नियुक्त करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

शहराला लागून असलेल्या सावखेडा शिवारात गिरणा पंपिंग रस्त्यावर राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन अंतर्गत ६५ लाख रुपये खर्च करून इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन होण्यापूर्वीच इमारतीतील सर्व साहित्य चोरीला गेले आहे. ज्या आरोग्य विभागाला ही इमारत औषध साठ्यासाठी देण्यात आली होती, त्या विभागाने तेथे जाण्यास नकार दिला आहे. दरम्यान, शासकीय वास्तू वापराविना पडून असल्याने चोरट्यांचे आश्रयस्थान झाल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले होते. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तातडीने दखल घेऊन ही इमारत वापरात आणणार असल्याची म्हटले आहे. या इमारतीची पाहणी करून तेथे दुरुस्ती करून सुरक्षारक्षकाची नियुक्ती केली जाणार असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...