आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अहिराणीच्या संवर्धनासाठी असंख्य चळवळी सुरू ; कवी रमेश पवार यांचे प्रतिपादन

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहिराणी बोलीने अनेक वर्षांपासून अनेक पिढ्यांना आपलेसे करत गोडवा निर्माण केला आहे. माणसाला आपल्या माणसाच्या जवळ आणण्याचं कार्य बोली भाषेने नेहमीच केले आहे‌. खान्देशी माणूस अहिराणी बोलीला विसरूच शकत नाही. त्याच्या बोली संदर्भाची निष्ठा आणि प्रामाणिकपणा नेहमीच उजागर झालेला आहे. बोलीभाषांमध्ये सौंदर्य, लय, ताल, सूर असून तेच प्रमाणभाषेचे सौंदर्य खुलवण्यासाठी पुरेसे आहे. अहिराणी बोलीचा मोठा भाषिक वर्ग असून तिच्या संवर्धनासाठी असंख्य चळवळी सुरू झाल्या आहेत, असे प्रतिपादन पहिल्या अहिर बोली संमेलनाचे अध्यक्ष तथा कवी रमेश यशवंत पवार यांनी केले.

गिरड (ता. पाचाेरा) येथील जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात अिहर बाेली संमेलन झाले. उद्घाटन कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. रमेश सूर्यवंशी, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिलिंद बागुल, प्रा. बी. एन. चौधरी, प्रा. रमेश माने, भाऊसाहेब देशमुख आदी विचार मंचावर उपस्थित होते. एकनाथ गोफणे यांनी सूत्रसंचालन तर रमेश धनगर यांनी आभार मानले.

अहिराणी बाेलताना मनात अभिमान बाळगावा : साहित्यिक प्रा. बी. एन.चौधरी यांनी अहिर बोली संमेलन म्हणजे अहिराणीत लिहणाऱ्या कवी, साहित्यिकांचे हक्काचे व्यासपीठ आहे. विविध डिजिटल माध्यमातून अहिराणी भाषा पोहाेचवण्याचे पहिले श्रेय कवी रमेश धनगर यांचे आहे. अहिराणी बोलताना कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड ठेवू नका, अभिमान बाळगावा. बोलीतूनच संवाद साधा, असे आवाहन प्रा. चाैधरी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...