आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत पारोळा शहरातील डॉ. व्ही. एम. जैन माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी नूपुर जितेंद्र चंद्रात्रे या विद्यार्थिनीने १०० पैकी १०० टक्के गुण मिळवून जिल्ह्यात पहिला येण्याचा बहुमान पटकावला आहे. नूपुरचे वाणिज्य शाखेतून पदवी घेऊन आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न आहे.
देवगाव व कंकराज या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दांपत्याची नूपुर ही मुलगी आहे. पहिलीपासून तिने बालाजी विद्या प्रबोधिनी संचालित शिक्षण मंडळ संस्थेत शिक्षण घेतले. तिने इतर क्लासेस न लावता शाळेच्या अभ्यासावरच अधिक भर दिला. शाळेत आज शिकवण्यात येणाऱ्या विषयाचे आधीच अवलोकन आणि तो विषय शिकवल्यानंतर सायंकाळी पुन्हा अभ्यास करणे असे सूत्र तिने राबवले. कोरोनात अभ्यासावर परिणाम झाल्याने तिने खासगी क्लासेसची मदत घेऊन अभ्यास केला. दहावी परीक्षेच्या तीन महिने आधी टीव्ही पाहणे बंद केले. १०० पैकी १०० गुण मिळतील याची तिला अपेक्षा नव्हती. ९७-९८ पर्यंत टक्के पडतील, अशी अपेक्षा होती. रात्री फारसा अभ्यास न करता दिवसा अभ्यासावर भर दिल्याचे नूपुर चंद्रात्रे हिने दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. दरम्यान, तिची मोठी बहीण वैष्णवी हिलादेखाील २०१६ मध्ये दहावीत ९७ टक्के गुण मिळाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.