आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Objection To Posting Pictures Of Teachers In Schools; 80% Of Parents Are Also Unaware; Organization Aggressive Against The Decision| Marathi News

वादंग:शाळेत शिक्षकांचे छायाचित्र लावण्यास विराेध; ८०% पालकही आहेत अनभिज्ञ; निर्णयाविरुद्ध संघटना आक्रमक

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेत शिक्षकांचे छायाचित्र लावण्याच्या निर्णयाचे शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणप्रेमींकडून स्वागत केले जात आहे. दुसरीकडे शिक्षक संघटना आणि शिक्षक लोकप्रतिनिधींनी कडाडून विरोध केला आहे. तर या निर्णयाबाबत मात्र पालक अनभिज्ञ असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. ‘शाळेत शिक्षकांचे छायाचित्र लावण्याचा निर्णय माहिती आहे का?’ असा प्रश्न विचारला असता ८०% पालक अनभिज्ञ असल्याचे ‘दिव्य मराठी’ने साधलेल्या संवादातून समाेर आले. शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळांमध्ये ‘आपले गुरुजी’ या नावाने शिक्षकांचे छायाचित्र वर्गात लावण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षक भारतीने वर्गात शिक्षकांचे छायाचित्र लावण्याचा निर्णय रद्द करा, अन्यथा काळ्या फिती लावून काम करणार असल्याचा इशारा दिला. शिक्षकांचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ करण्यासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणांना अधिक सक्षम करावे. वर्गात लावलेल्या शिक्षकांच्या छायाचित्रासंदर्भात काही अनुचित प्रकार घडल्यास कोण जबाबदार? असा प्रश्न उपस्थित केला आहे. शिक्षक परिषदेचाही विराेध आहे.

सरकारने कंबर कसली : मुख्यमंत्री शिंदे यांनी दांडीबहाद्दर शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. शाळेत न जाताच सरकारचा पगार घेऊन कामावर दांडी मारणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. वर्गावर शिकवणाऱ्या शिक्षकाचे फोटो लावण्याचे आदेश आहेत.

आपले गुरूजी अभियानाचा उद्देश
शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांत आदराची भावना निर्माण व्हावी या हेतूने ‘आपले गुरूजी’ अभियान राबवण्यात येणार आहे. या मुळे आपल्यासाठी सरकारने कोणते शिक्षक नियुक्त केले? याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यातून बोगस शिक्षक कोण? हे माहीत व्हावे यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे. अर्थात, यातून दांडीबहाद्दर शिक्षकांना चाप लागणार आहे.

शिक्षकांना अपमानित करू नका
शैक्षणिक गुणवत्ता वाढ व अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळण्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना कराव्या. शिक्षकांनी चांगल्या प्रकारचे काम केले किंवा नाही याबाबतचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ स्वरूपात व्हावे व त्यासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणांना सक्षम करावे. ९९ % शिक्षक प्रामाणिक काम करताहेत. अपवादात्मक प्रकरणात कामचुकारपणा करणाऱ्यांमुळे सर्वांना जबाबदार धरणे याेग्य होणार नाही.दोषींवरील कारवाईचे समर्थन करणार नाही पण त्यासाठी सर्वांनाअपमानित करू नये,असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...