आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणचा इशारा:कारवाईत अडथळे आणल्यास थेट गुन्हे

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीटरमध्ये फेरफार किंवा आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांविरोधात महावितरणची धडक मोहीम सुरू आहे. या कारवाईत अडथळे आणणाऱ्या तसेच वीजचोरीची बिले न भरणाऱ्या ग्राहकांवर थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. ९ डिसेंबर रोजी महावितरणच्या जोशीपेठ कक्षाचे सहायक अभियंता उमाकांत पाटील व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गेले; मात्र जमावाने त्यांना घेराव घालून कारवाईत अडथळा आणला होता, याची गंभीर दखल घेत महावितरण प्रशासनाने घेतली आहे.

वीजचोरी रोखण्याच्या महावितरणच्या मोहिमेचा भाग म्हणून राज्यात सर्वाधिक वीज गळती असलेले २३० फीडर निश्चित करण्यात आले आहेत. फीडरवरून दिली गेलेली वीज आणि संबंधित ग्राहकांच्या मीटरवर नोंद झालेला विजेचा वापर यांची पडताळणी करून वीज गळती निश्चित केली जाते. मुख्यतः वीजचोरीमुळे तूट वाढते. या २३० फीडरमध्ये विठ्ठलपेठ फीडरचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...