आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार:आरोपीला 5 वर्षे सश्रम कारावास, 45 हजारांचा दंड; पीडितेने निर्भयपणे दिली साक्ष

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने बुधवारी पाच वर्षे सश्रम कारावास आणि 45 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. लाला मुकर्रर पटेल (वय 53) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात आठ वर्षीय मुलगी आपल्या कुठुंबियांसह वास्तव्याला आहे. 11 ऑक्टोबर 2016 रोजी पिडीत मुलीच्या घराच्या परिसरात लाला पटेल याच्या दुकानात वॉशींग पावडर घेण्यासाठी गेली होती. यावेळी पटेल याने तिला घरात ओढुन नेत लैंगिक अत्याचार केला.

या प्रकरणी 12 ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याच दिवशी पटेल याला अटक करण्यात आली होती. गुन्ह्याचा तपास पुर्ण करुन पोलिसांनी दोषारोप दाखल केल्यानंतर जळगाव जिल्हा न्यायालयाचे जलद विशेष न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली.

या खटल्यात एकुण पाच साक्षिदारांची साक्ष नोंदविण्यात आली यात पीडित मुलीची आई, पीडित मुलगी, तपासाधिकारी आणि पंच यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या. सुनावणाीअंती न्यायालयाने पटेल याला दोषी ठरवत पाच वर्षे सश्रम कारावास आणि 45 हजार रूपयांचा दंड, तसेच दंड न भरल्याच पुन्हा 4 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे ॲड. चारूलता बोरसे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.

पीडितेने निर्भयपणे दिली साक्ष

या खटल्यात पीडित मुलीची देखील साक्ष झाली. अल्पवयीन असून देखील तिने निर्भयपणे साक्ष दिली. सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी प्रभावीपणे पुरावे सादर केले. तर पोलिसांनी देखील योग्य दिशेने तपास करून पुरावे गोळा केले होते.

बातम्या आणखी आहेत...