आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Offensive Text On Wall Adjacent To Superintendent Of Police's Residence; The Text On The Wall Was Immediately Erased As Soon As It Was Noticed|marathi News

मजकूर:पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थान शेजारील भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर; लक्षात येताच भिंतीवरील मजकूर तत्काळ खोडला

जळगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुख्य गजबजलेला चौक म्हणजे काव्य रत्नावली चौक. याच चौकालगत जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांचे ‘अभय’ नावाचे निवासस्थान आहे. पोलिस अधीक्षकांच्या बंगल्याच्या शेजारीच काव्यरत्नावली चौकाकडून मेहरूणकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या भिंतीवर काही टारगटांनी व्यवस्थेचा निषेध करणारी पोस्ट लिहिल्याचे समोर आले.

पोलिस अधीक्षक यांच्या निवासस्थानाला लागून मोकळी जागा आहे. फूटपाथला लागून असलेल्या या भिंतीवर नेहमी काही ना काही उपक्रम राबवण्यात येतात किंवा संदेश लिहिले जातात.या भिंतीवर टारगटांनी भिंतीवर थेट व्यवस्थेचा निषेध करीत व्यवस्थेला शिवीगाळ करणारी पोस्ट लिहिली आहे. एकीकडे HipHop चे स्वागत तर दुसरीकडे ‘Fuck the System’ असे लिहीत टारगट तरुणांनी व्यवस्थेलाच आव्हान दिले. टारगटांवर कारवाई करावी करावी, असा सूर उमटतो आहे.

बातम्या आणखी आहेत...