आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:रामानंद नगर पोलिस निरीक्षकांच्या दालनातच अधिकारी व कर्मचाऱ्यामध्ये बाचाबाची

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामानंद नगर पोलिस ठाण्यात शनिवारी दुपारी पोलिस निरीक्षकांच्या दालनातच पोलिस उपनिरीक्षक व कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली. फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला मदत करीत असल्याच्या संशयावरुन तो वाद झाल्याचे समोर आले आहे. मात्र,अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील कारवाईवरुन हा वाद झाल्याबाबत चर्चा रंगली आहे.

पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख व कर्मचारी अनमोल पटेल यांच्यात पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या दालनात शाब्दीक वादानंतर बाचाबाची झाली आहे. रामानंद नगर पोलिस ठाण्यात प्लॉट खरेदीमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी नूर मोहम्मद अब्दुल गफुर रा.आझादनगर कब्रस्थानजवळ जळगाव याच्याविरुध्द विशाल राजेंद्र चोपडा यांनी तक्रार दिलेली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस कर्मचारी पटेल हे करीत होते. पोलिस कर्मचारी पटेल यांच्याकडे असलेल्या या तक्रारीचा तपास काढून अन्य कोणत्याही कर्मचाऱ्यास द्यावा,अशी मागणी तक्रारदार विशाल चोपडा यांनी 16 जून रोजीच एका पत्राव्दारे पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याकडे केली होती.

दरम्यान, नूर मोहम्मद हा पटेल यांच्या ओळखीतला आहे. ते संशयिताचे संरक्षण करीत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक देशमुख यांनी नूर याला पोलिस ठाण्यात बोलविले होते. मात्र,त्याने मोबाईल बंद करुन ठेवलेला होता.पटेल यांनीच त्याला मोबाईल बंद करुन ठेवायला सांगितले. देशमुख यांनी संपर्क साधल्यास प्रतिसाद न देण्याचेही सांगितल्याच्या संशयावरुन दोघांमध्ये वाद झाला.

या प्रकरणात पोलिस निरीक्षक शिंदे यांनी दालनात बोलविलेले होते. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. शिंदे यांनी पटेल यांना सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्याकडे नेले.त्यानंतर आपसी वाद मिटविण्याच्या सूचना त्यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना दिल्या.रामानंद नगर पोलिसात ठाण्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आपसी वाद झालेला आहे. वाळूच्या वाहनावर कारवाई करण्यावरुन तो वाद झालेला नाही. किरकोळ वाद होता. तो मिटलेला असल्याचे सहायक पोलिस अधीक्षक चिंथा यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...