आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याच्या पुरवठा विभागाने पुरवठा कार्यालयातील संवर्गनिहाय पदसंख्या निश्चित करण्याबाबत आकृतीबंध तयार केला आहे. त्यानुसार जिल्ह्यासाठी 144 पदे निश्चीत केली आहे. त्यात पुरवठा निरीक्षण अधिकारी व लिपिकांची तीन पदे कमी करण्यात आली. चंद्रपूर, अकोला या लोकसंख्येने कमी असलेल्या जिल्ह्यांना अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय देण्यात आले.
तुलनेत लाेकसंख्येने जास्त असलेल्या जळगाव शहरासाठी मागणी असूनही सुधारित आकृतीबंधात हे कार्यालयात देण्यात आलेले नाही. त्यामुळे विशेष बाब म्हणून हा आकृतीबंध सुधारित करण्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी पुरवठा उपायुक्तांकडे मागणी केली आहे.
शहराचा विस्तार मोठा असल्याने अन्नधान्य वितरण अधिकारी हे पद प्रस्तावित करण्यात आलेले होते. सन 2011 च्या जनगणनेनुसार अकोला चंद्रपूर शहराची लोकसंख्या 3 लाख 20 हजार 379 तर अकोला शहराची 4 लाख 25 हजार 817 एवढी आहे. त्या तुलनेत जळगाव शहराची लोकसंख्या 4 लाख 60 हजार 228 एवढी आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी स्वतंंत्र अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय लोकसंख्या कमी असूनही त्या दोन शहरांना देण्यात आले.
पदे कमी केली
जिल्हा कार्यालयात लेखा अधिकारी दर्जाचे पदही प्रस्तावित करण्यात आले होते. अर्धन्यायिक कामासाठी स्वतंत्र लघुलेखक पदाची देखील मागणी करण्यात आली होती. आकृतीबंधात जिल्हा कार्यालयातील पदे कमी करुन तालुकास्तरावर देण्यात आली आहेत. नवीन आकृतीबंधानुसार जिल्हा कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी पद कमी करण्यात आले.
वाहन असूनही चालक नाही
जिल्हास्तरावर दोन लेखा पर्यवेक्षक देण्यात आले होते. त्यापैकी एक पद कमी करण्यात आले. 40 पुरवठा निरीक्षक, अव्वल कारकून 24 व गोदाम व्यवस्थापकाची 16 पदे निश्चीत करुन देण्यात आली आहेत. तालुक्यात केवळ एक अव्वल कारकून, पुरवठा निरीक्षक पद ठेवल्याने दोन अव्वल कारकून पदे कमी देणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी यांना वाहन असून चालक नाही. त्यासाठी चालकाची मागणी नोंदवण्यात आली होती.
16 गोदामपाल
जिल्ह्यासाठी एकूण 24 अव्वल कारकुनांपैकी तालुका कार्यालयात 15 पदे दिल्यावर जिल्हा कार्यालयात केवळ 9 अव्वल कारकून पदे शिल्लक राहतील. तालुक्यातील दाेन अव्वल कारकून पदे कमी करण्यात आली आहेत. पंधरा तालुक्यांसाठी 30 लिपिक देण्यात आले. सतरा गोदामांसाठी 16 गोदामपाल देण्यात आले. नवीन आकृतीबंधानुसार पदांची पुनर्रचना करण्यात आली. जिल्हा कार्यालयातील लिपिक व अव्वल कारकून ही पदे कमी होत आहेत. पंधरा तालुके असलेल्या जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून प्रस्तावित केल्यानुसार आकृतीबंध सुधारित करण्याची मागणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.