आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताबा:गोलाणी मार्केटमध्ये विविध प्रकारच्या व्यावसायिकांची कार्यालये; गोलाणी मार्केटच्या वाहनतळावर गाळेधारकांसह भाडेकरूंचा ताबा

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातीलमोबाइल मार्केट अशी नवीन ओळख झालेल्या व. वा. व्यापारी संकुलात (गोलाणी मार्केट) पार्किंगची समस्या आहे. दिवसाला किमान दहा हजारांपेक्षा जास्त लोकांचा वावर असलेल्या मार्केटमध्ये ६७५ वाहनांच्या पार्किंगची सोय आहे. पण दुकानांची संख्याच १०९० आहे. आहे त्या पार्किंगमध्येही गाळेधारक आणि भाडेकरूंचा अधिकार असतो. त्यामुळे ग्राहकांच्या वाहनांसाठी रस्त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. गोलाणी मार्केटमध्ये विविध प्रकारच्या व्यावसायिकांची कार्यालये आहेत. गेल्या काही वर्षांत या मार्केटमध्येमोबाइलच्या दुकानांची संख्या कमालीची वाढली आहेत. जास्त नागरिकांचा कामानिमित्त मार्केटच्या तीनही मजल्यांवर वावर सुरू असतो. त्यामुळे सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत मार्केटमध्ये वर्दळ असते.

३५० कारचे नियाेजन, पन्नासचीही जागा नाही : मनपाने तयार केलेल्या पर्यावरणाच्या अहवालातील नोदीनुसार गोलाणी मार्केटमध्ये ३५० चारचाकींसाठी पार्किंगची सोय आहे. तर केवळ २५ दुचाकी व ३०० सायकलींची व्यवस्था केली आहे. एकूण ६७५ वाहनांची पार्किंगची सोय आहे; परंतु प्रत्यक्षात चित्र उलटेच आहे. मार्केटच्या फ्रंटसाइडला प्रत्येक विंगमध्ये दोन्ही बाजूने दुकानांसमोर गाळेधारक व त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहने लावलेली असतात. वास्तविक या मार्केटमध्ये १०९० गाळे आहेत. यात रहिवासी गाळ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे एका गाळ्यासाठी एका वाहनाची व्यवस्था म्हटली तरी ४१५ वाहनांसाठी जागाच शिल्लक नाही. चारचाकी वाहनांसाठी मार्केटच्या मागे तुरळक जागा असून, वर्दळीचा रस्ता हा दुसरा पर्याय आहे.

नवीन बीजे मार्केटमध्ये शिस्तीचा अभाव
नवीन बी. जे. मार्केटमध्ये ९५० गाळे असून, त्यापैकी बहुसंख्य गाळ्यांचा वापरहोत असतो. पालिकेकडून दुर्लक्षित असलेल्या या मार्केटमध्ये शिस्तीचा अभाव आहे. मार्केटच्या चारही बाजूने पुरेशी जागा असतानाही खासगी व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे पार्किंगसाठी गाळेधारकांनाच जागा शाेधण्याची वेळ आली आहे. महापालिका प्रशासनाने पार्किंगची जागामोकळी करून दिली तरीमोठी
समस्या सुटू शकते.

बी. जे. मार्केटमध्ये गैरसोय : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या जुने बी. जे. मार्केटमध्ये शेतीविषयक बाबी उपलब्ध असतात. याशिवाय कामगार न्यायालय, महिला न्यायालय, नगररचना विभाग, आयकर विभाग यासारखे शासकीय कार्यालये आहेत. एकूण ३३९ गाळे आहेत. त्यामुळे दिवसभर सर्वसामान्य नागरिकांची वर्दळ असते. दुकानदारांना त्यांच्या दुकानासमोर वाहने लावावी लागतात. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांसाठी जागाच शिल्लक नाही. त्यामुळे दुकानांसमाेर वाहने लावल्यास वादाचे प्रसंग उद्भवतात. चारचाकीसाठी तर रस्त्याशिवाय दुसरा पर्याय नाही.होलसेल व्यवसायाचे केंद्र असल्याने दिवसभरमोठी वाहने तळ ठाेकून राहतात. त्यामुळे आहे ती जागाही व्यापली जाते व गैरसोयहोते.