आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजीरोटीचा प्रश्न सुटतो:अहो आश्चर्यम, तापी नदीपात्रात शोधले तर सोनेही सापडते

यावल / शेखर पटेल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल तालुक्यातील टाकरखेडाजवळ शेळगाव बॅरेज आहे. येथील तापी पात्रामध्ये अनेक जण दररोज सोने, चांदीचा शोध घेताना दिसतात. अनेक गावांमध्ये तापी काठावर अंत्यविधी, तर कुठे तापीत अस्थिविसर्जन केले जाते. यावेळी मृताच्या अंगावरील सोने, चांदीच्या दागिन्यांचे अंश पाण्यासोबत वाहत पुढे येतात. असे अंश शोधण्यासाठी दिवस उजाडताच टाकरखेडा येथील तापी पात्रात मजुरांची लगबग सुरू होते. कधी दिवसभर, तर कधी सलग आठवडाभराच्या मेहनतीनंतर कुणाला काही गवसले तर चेहरे आनंदाने उजळतात. कारण, त्यामुळे काही दिवसांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटतो.

टाकरखेडा जवळ तापी नदीपात्रावर शेळगाव बॅरेज आहे. या बॅरेज जवळील तापी पात्रामध्ये दररोज सकाळचे चित्र काही वेगळे दिसते. दररोज सकाळ होताच अनेक जण तापी पात्रात काही ना काही शोधताना दिसतात. सुरुवातीला वाटले की हे खेकडे किंवा इतर काही शोध घेत असतील. पण, विचारपूस केल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. कारण, हे मजूर नदीपात्रात चक्क सोनं, चांदी शोधतात. त्यापैकी अनेकांचे नशीब उचलून दररोज पोटापाण्याची सोय होते. दरम्यान, नदीपात्रात सोने कसे मिळते? ही आश्चर्याची बाब असली तरी वास्तव आहे. त्याचे कारण काठावर होणारे अंत्यविधी व अस्थिविसर्जन आहे.

तापी पात्रात दान टाकण्याची श्रद्धा...तापीला पवित्र मानले जाते. यामुळे नदीपात्रात नाणे टाकण्याची परंपरा अनेक भाविक अजूनही पाळतात. कुटुंबातील कुणाचा मृत्यू झाल्यास अस्थिविसर्जनासाठी तापीचे पात्र गाठले जाते. अनेकवेळा मृतदेहाच्या अंगावर दागिने असतात. त्यांचे अंश पुढे पाण्यासोबत वाहत येतात. तसेच झीज झालेल्या देवाच्या धातूच्या मूर्ती नदीपात्रात विसर्जित केल्या जातात.

का सापडतात सोने-चांदीचे अंश? गेल्या महिन्यात शेळगाव बॅरेजमध्ये पाणी अडवण्यात आले. यामुळे नदीचा वाहता प्रवाहाला रोखला गेला. परिणामी अनेक चीजवस्तू एका दाबाने शेवटच्या टाकला येतात. नंतर पाणी सोडल्यावर त्या प्रामुख्याने बाहेर पडून नदीपात्रातील दगडगोट्यांमध्ये अडकतात. टाकरखेडा येथील नदीपात्र या पद्धतीचे असलेल्या तेथे मजुरांकडून सोने, चांदीच्या दागिन्यांचे अंश शोधले जातात.

बातम्या आणखी आहेत...