आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चढ-उतार आठवडाभर राहणार‎:साेन्याच्या दरात प्रतिताेळा‎ आठशे रुपयांपर्यंत घसरण‎

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेन्याच्या दरात प्रतिताेळा (१० ग्रॅम) १८००‎ रुपयांची तेजी आली हाेती. त्यात शुक्रवारी सुरुवातीला‎ १४५० रुपयांची घसरण झाली. दिवसभर चढउतार हाेत‎ अखेर ती ८०० रुपयांच्या घसरणीवर थांबली. शनिवारी‎ साेन्याचे दर ५७ हजार ८०० रुपये प्रतिताेळा झाले हाेते.‎ आंतरराष्ट्रीय जगतात अमेरिकन सेंट्रल बँकेने साेन्याची‎ खरेदी सुरू केल्याने गुरुवारी साेन्याच्या प्रतिताेळ्याच्या‎ दरात अचानक १८०० रुपयांची तेजी नाेंदवली गेली.

ती‎ दुसऱ्या दिवशी कायम राहण्याएेवजी त्यात १४५०‎ रुपयांच्या घसरणीने बाजार खुला झाला. दुपारी त्यात‎ १३०० रुपयांची घसरण झाली; परंतु संध्याकाळी पुन्हा‎ तेजी नाेंदवून ८०० रुपयांची वाढ हाेत ५७ हजार ८०० रुपये‎ प्रति ताेळ्याचे दर झाले. हेच दर शनिवारीही कायम हाेते.‎ त्याचे कारण युराेपियन डाॅलरच्या तुलनेत अमेरिकन‎ डाॅलरचे दर घसरले हे असल्याचे जाणकार सांगतात.‎

बातम्या आणखी आहेत...