आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:दूध संघात जुने पाच, तर नवीन 15 संचालक; आता अध्यक्ष निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. त्यानंतर आता अध्यक्ष निवडीच्या घडामाेडी सुरू झाल्या आहेत. संघात एकूण सहा आमदार निवडून आले आहेत. त्यातील दाेघे मंत्री आहेत. एकूण २० पैकी १५ संचालक हे प्रथमच संचालक म्हणून निवडून आले. उर्वरित पाच जण हे यापुर्वी संघाचे संचालक राहिले आहेत.

दूध संघात ३२ दिवस प्रशासक मंडळाचे प्रमुख म्हणून काम केलेले आमदार मंगेश चव्हाण यांचीच अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेकडून देखील अध्यक्षपदासाठी प्रयत्न आहेत. अध्यक्षपदाची चर्चा करताना संघात सध्या सुरू असलेल्या चाैकशीचे प्रकरण प्राधान्यावर असेल. निवडून आलेल्या २० संचालकांपैकी सर्वाधिक ८ भाजपचे, ७ राष्ट्रवादीचे आहेत, ५ शिंदेगटाचे संचालक निवडून आले आहेत. राष्ट्रवादीचे ७ पैकी ४ संचालक हे विराेधी पॅनलमधील, तर तीन भाजप-शिंदेसेनेच्या पॅनलमध्ये आहेत. २० पैकी १६ संचालक असलेल्या भाजप-शिंदेसेनेची सत्ता आहे.

बातम्या आणखी आहेत...