आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ती' सुरक्षित का?:वृद्धाकडून महिलेच्या तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी; जळगावच्या बळीराम पेठेतील घटना, गुन्हा दाखल

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगावमध्ये महिलेकडे वाईट नजरेने बघणाऱ्या व्यक्तिला समज देण्यासाठी गेलेल्या वृद्ध व्यक्तिकडून महिलेला तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांच्यावर महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका प्रकार काय?

शहरातील बळीराम पेठ भागात राहणाऱ्या महिलेकडे शेजारील वृध्द स्वच्छतागृहाच्या जाळीतून वेळोवेळी वाईट नजरेने बघत होता. प्रारंभी त्या महिलेने दुर्लक्ष केले. त्यानंतरही तो अधिकच त्रास देवू लागला. त्याचे वागणे असह्य झाल्याने समजावण्यासाठी ती महिला गुरुवारी त्याच्या घरी गेली. तेथे त्याने तोंडावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देत त्या महिलेचा विनयभंग केला.या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेकडून वृद्धाला समज

शहरतील बळीराम पेठेत राहणाऱ्या त्या महिलेच्या घराशेजारी गेल्या सात ते आठ वर्षांपासून तो वृध्द राहतो. ती महिला स्वच्छतागृहात गेल्यानंतर तो जाळीतून वाईट उद्देशाने बघत होता. ती महिला घरात असताना तो त्याच्या घराचा दरवाजा उघडा ठेवत होता. महिलेकडे वाईट नजरेने बघत होता. प्रारंभी त्या महिलेने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्या वृध्दाचे वागणे अधिकच बिघडले. तो वाईट नजरेने तिच्याकडे बघतच राहिला. त्याचे विचित्र वागणे तिला असह्य झाले होते. वृद्ध असल्याने तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ती महिला गुरुवारी त्याच्या घरीही गेली होती. त्याचा उपयोग झाला नाही.

वृद्धाकडून महिलेला धमकी

वृद्धाने तिचे म्हणणे ऐकून न घेता वाद घातला. तसेच महिलेच्या तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली. तसेच तिला लज्जास्पद वाटेल असे कृत्य केले. या प्रकरणी त्या महिलेने वृध्दाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...