आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:तुटलेली विद्युत तार काढण्यासाठी झाडावर; जनमित्रांकडून सहकाऱ्याला वाचवणाऱ्या नीलेश भोसलेंचा गौरव

जळगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहकाऱ्यांना वाचवणाऱ्या जनमित्र नीलेश भोसले यांचा बुधवारी जनमित्रांकडून गौरव करण्यात आला. तसेच जनमित्रांनी कार्यकारी अभियंता व्ही. डी. पाटील यांचीही देखील भेट घेत त्यांना याबाबत माहिती दिली.

एमआयडीसीतील अयोध्यानगरात १२ जून रोजी तुटलेली विद्युत तार काढण्यासाठी झाडावर चढून काम करताना झाडाची फांदी तुटली. यात वरून कोसळणाऱ्या नितीन पाटील यांना नीलेश भोसले यांनी वरच्यावर झेलल्याने त्यांना अपघात होण्यापासून वाचवले. वास्तविक हे काम करण्याची जबाबदारी नेमलेल्या एजन्सीची आहे; मात्र हे एजन्सीचे लोक उपलब्ध न झाल्याने जनमित्रांनाच धावपळ करत व संसाधनांच्या व्यतिरिक्त काम करावे लागले.

बातम्या आणखी आहेत...