आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहा वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झालेल्या प्राैढ फरसाण व्यापाऱ्याने दुसऱ्या लग्नासाठी मध्यस्थाला अडीच लाख रुपये देऊन बेळगाव येथून मुलगी (३३ वर्षीय महिला) जळगावात आणून तिच्या साेबत लग्न केले; परंतु नातेवाइकांची आठवण येते म्हणून लग्नानंतर पाच दिवसांत व्यापाऱ्याला दादर येथे घेऊन गेलेली नववधू स्टेशनवरूनच पसार झाली. या प्रकरणी व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून शनिपेठ पाेलिस ठाण्यात मध्यस्थ व पळून गेलेली महिला या दाेघांविरुद्ध साेमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. कांचननगरातील शैलेंद्र किसनलाल सारस्वत (वय ४६) यांनी लग्नासाठी बेळगाव येथून मुलगी आणून देण्यासाठी परिचित प्रकाश साेनी (रा. बेळगाव) यांना २ लाख ६१ हजार रुपये दिले हाेते. त्यानंतर बेळगाव येथे एप्रिल महिन्यात मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी पसंत पडल्यानंतर मे महिन्यात अपर्णा चंद्रकांत नाईक (वय ३३, रा. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) हिच्यासाेबत शैलेंद्र सारस्वत यांचे जळगावात लग्न लागले. पहिल्या दाेन-चार दिवसांतच तिने करमत नाही, नातेवाइकांची आठवण येते असे सांगून सारस्वत यांना दादर येथे घेऊन गेली. दादर रेल्वे स्टेशनवरून अपर्णा पसार झाली. याप्रकरणी शनिपेठ पाेलिस ठाण्यात प्रकाश साेनी व अपर्णा नाईक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मध्यस्थ ७० वर्षीय वृद्ध, दाेन्ही डाेळ्यांनी आंधळा मुलगी मिळवून देणारा मध्यस्थ प्रकाश साेनी हा व्यक्ती ७० वर्षीय वृद्ध असून, ताे दाेन्ही डाेळ्यांनी आंधळा आहे. त्याला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा विकार असल्याची माहिती मिळाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.