आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालयाच्या प्राथमिक विभागात वर्षभरातील सर्व एकादशी साजऱ्या करण्यात येतात. या एकादशींचे आमलकी एकादशीला समारोप करण्यात येताे. ३ मार्च राेजी आमलकी एकादशी असून यानिमित्ताने २०० विद्यार्थ्यांनी संतसृष्टी साकारली आहे. ३ मार्चला सकाळी १० ते दुपारी ४ व ४ मार्चला सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेदरम्यान ही संतसृष्टी पालक व नागरिकांना पाहता येणार आहे. यात संत नामदेव पायरी, गरुडखांब, संत चोखामेळा समाधी, ज्ञानेश्वर-मुक्तार्इ ंची ताटी, जनाबाईंचे घर, संत गोरा कुंभारांची झोपडी हे संतसृष्टीचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.
संताच्या जीवनावर पथनाट्य : विद्यार्थी कान्होपात्रा-विठ्ठल भेट, सखुबाई-विठ्ठल दर्शन, पुंडलिक विटेचा प्रसंग, एकनाथ-जनार्दन स्वामी प्रसंग, सावता माळी-विठ्ठल भेट, संत ज्ञानेश्वर महाराज व रेड्याच्या प्रसंग विद्यार्थी साकारणार आहे. तसेच संत मेळाव्यात कीर्तन, भारुड, अभंगवाणी, पावली, दिंडी, संतांच्या जीवनावर आधारित प्रसंग पथनाट्यातून सादर करणार आहे.
विद्यार्थ्यांना संत साहित्य माहीत व्हावे, संतांची ओळख, परिचय होऊन संतांच्या ओव्या, अभंगातून जीवनमूल्ये समजण्यासाठी डॉ. आचार्य विद्यालयातर्फे संतसृष्टीचा उपक्रम राबवण्यात येत आहे. महिनाभराच्या परिश्रमानंतर २०० विद्यार्थी ही संतसृष्टी साकारली आहे. संतसृष्टीचा संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांनी शेणाने सारवला असून येथे संत काळातील ग्रामीण सृष्टी ३ व ४ मार्च राेजी पालकांना पाहता येणार आहे. या वेळी दादा महाराज जोशी, भरत अमळकर, महापौर जयश्री महाजन, मुख्याध्यापिका योगिता शिंपी व इतर शिक्षक उपस्थित राहतील.
संतसृष्टीत मुलांची ५० हस्तलिखिते, संतावरील चित्रांचे प्रदर्शन
मुलांनी तयार केलेल्या संतांच्या गोष्टींची ५० हस्तलिखित, विद्यार्थ्यांनी संतांवर काढलेले चित्रांचे प्रदर्शन, संतांवरील डॉक्युमेंट्री संतसृष्टीत बघायला मिळणार आहे. तसेच संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत सेना महाराज, संत चोखामेळा, संत नरहरी सोनार, संत मुक्ताबाई, संत पुंडलिक, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ या संतांची पात्रेदेखील विद्यार्थी वेशभूषेसह साकारणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.