आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिस अधीक्षक बंगल्याच्या संरक्षक भिंतीवर बाहेरच्या बाजुने अज्ञात व्यक्तीने यंत्रणेबद्दल अपशब्द लिहीले. ऑईल पेंट रंगाने हे वाक्य रंगवण्यात आले. रविवारी दुपारी 12 वाजता हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. यानंतर रामानंदनगर पोलिसांनी तातडीने हे वाक्य मिटवले.
प्रशासनाबद्दल अनेकांच्या मनात राग असतो. कोणी आंदोलन, निदर्शन करुन निषेध करतो. तर कुणी वरीष्ठांकडे तक्रार करुन न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जळगावात हा अजब प्रकार रविवारी समोर आला. यात चक्क पोलिस अधीक्षक बंगल्याच्या संरक्षक भिंतीच्या बाहेर आक्षेपार्ह मजकुर लिहीलेला होता. तर याच्या शेजारीच ‘रिस्पेक्ट जलगॉन हिप-हॉप डीएसपी’ असेही लिहीले आहे. या दुसऱ्या वाक्याचा अर्थ कळत असला तरी लिहणाऱ्याचा उद्देश काय? ते यातून स्पष्ट होत नाहीये.
शहरात प्रचंड खळबळ
हा प्रकार उघडकीस येताच रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे यांच्यासह पथकाने तातडीने धाव घेतली. यानंतर पोलिसांनी सुरुवातीला हा मजकुर कापडाने झाकला. यानंतर त्यावर रंग मारुन मजकुर मिटवण्यात आला. या प्रकारामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. काव्यरत्नावली चौकात हा प्रकार घडला आहे. या चौकाला लागुन न्यायाधी, पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी, अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक अशा वरीष्ठांची निवासस्थाने आहेत. दररोज शकडो नागरीक चौकात सायंकाळी फिरायला येतात. याच भागत यंत्रणेच्या विषयी आक्षेपार्ह लिहलेले असल्यामुळे मोठा अर्थ काढला जातो आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.