आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा अॅक्शन माेडमध्ये:दीड लाख मालमत्ता कर थकीत,‎ नऊ फ्लॅटचे नळ कनेक्शन बंद

जळगाव6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभय याेजनेनंतरही थकबाकी न‎ भरणाऱ्या मिळकतधारकांविरुद्ध कारवाई सुरू‎ झाली. शनिवारी थकबाकीदारांना जप्तीचे‎ अधिपत्र बजावण्यास सुरुवात झाली.‎ मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या थकीत‎ रकमेवर १०० शास्ती माफीची याेजना ३१‎ मार्चपर्यंत आहे; परंतु वर्षानुवर्षे पैसे न‎ भरणाऱ्या मालमत्ताधारकांविरुद्ध कडक‎ कारवाईचा निर्णय शुक्रवारच्या बैठकीत‎ घेण्यात आला.

प्रभाग समिती १ व ३ मध्ये‎ जप्तीच्या नाेटीस बजावण्यात आल्या. प्रभाग‎ समिती तीनमध्ये मालमत्ता थकबाकीदार‎ असलेले माेहाडी राेडवरील इंपेरिअल‎ अपार्टमेंटमधील १६ पैकी नऊ फ्लॅट धारकांचे‎ नळ कनेक्शन बंद झाले आहेत. त्यांच्याकडे १‎ लाख ५८ हजार रुपयांची थकबाकी आहे.‎

बातम्या आणखी आहेत...