आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:गावठी पिस्तूल विक्रीस आणणाऱ्या एकास अटक, एमआयडीसी पोलिसांकडून कारवाई

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मासूमवाडी येथील आठवडे बाजार परिसरात दोन गावठी पिस्तूल विक्रीस आणणाऱ्या एकास एमआयडीसी पोलिसांनी १६ मार्च रोजी अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन पिस्तूल जप्त केल्या आहेत.

अली उर्फ डॉलर शाहरुख शकील अली (वय २९, रा. गेंदालाल मिल) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अली हा मासूमवाडी येथील आठवडे बाजारात १६ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गावठी पिस्तूल विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सुधीर सावळे, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार तिघांसह सहायक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, सचिन पाटील, मुदस्सर काझी, साईनाथ मुंडे यांच्या पथकाने मासूमवाडी परिसरात सापळा रचला. या वेळी अली हा संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे दिसून आला. त्याने पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करताच पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. चौकशी केली असता त्याच्याजवळ दोन गावठी पिस्तूल आढळून आले. हे पिस्तूल विक्री करण्यासाठी आणल्याची माहिती त्याने दिली.

१७ रोजी अलीला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास अतुल वंजारी करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...