आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनयात्रा संपवली:धावत्या रेल्वेखाली एकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धावत्या रेल्वेखाली झोकून देत एकाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास भादली रेल्वे स्टेशनजवळ घडली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.नशिराबाद येथे चंद्रकांत माळी(वय ४१)हे वास्तव्यास असून ते खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरी करीत होते. बुधवारी दुपारच्या सुमारास ते जेवण करून बाहेर गेले. त्यांनी भादली रेल्वे स्टेशन जवळील अप लाइनवरील खांब क्रमांक ४२९/०२ गेट नंबर १५२ जवळ धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आपली जीवनयात्रा संपवली.

लोको पायलट यांनी तत्काळ घटनेची माहिती रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना दिली. स्टेशन प्रबंधकांनी घटनेची माहिती नशिराबाद पोलिसांना दिली. पोलिस ठाण्याचे कर्मचारी सफौ रवींद्र तायडे व विनोद भोई यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. चंद्रकांत माळी यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...