आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकस्मात मृत्यूची नोंद:ट्रॅक्टरचे चाक पोटावरून गेल्याने एकाचा मृत्यू

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रॅक्टरचे चाक पोटावरून गेल्याने विजय भिका चौधरी (वय ४३, रा. सावखेडा, ता. जळगाव) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सावखेडा येथील विजय चौधरी हे मंगळवारी ट्रॅक्टर दुरुस्ती करीत असताना त्यांच्या पोटावरून ट्रॅक्टरचे चाक गेले. यात चौधरी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर बुधवारी उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...