आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कार-दुचाकी अपघातात एक ठारजागीच ठार, तीन जण गंभीर जखमी

पिशोर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकी व कारच्या अपघातात एक जण जागीच ठार, तर तीन जण जखमी झाले. हा अपघात पिशोर-सिल्लोड रोडवर मोहंद्री फाट्याच्या पुढे १२ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडला. समाधान कारभारी हांडे (२१, रा.पिपरखेडा ता. कन्नड) असे मृताचे नाव आहे. तर किशोर रामसिंग राजपूत (२०), कृष्णा सुभाष अहिरे(२०), अमोल गंगाधर गायकवाड (१९) हे अपघातात जखमी झाले.

पिशोर पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मावस भावाचे लग्न असल्याने भेटवस्तू घेण्यासाठी दुचाकीवर (एमएच २० एएल ७८४७) जाताना भरधाव कारने जोरदार धडक दिली. यात समाधानचा जागीच मृत्यू झाला. नाचनवेल येथील ग्रामीण रुग्णालयात समाधानवर शवविच्छेदन करण्यात आले. तर जखमी तिघांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक कोमल शिंदे, किरण गंडे, संजय लगड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...