आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:घरकुल जागा खरेदीसाठी एक लाख रुपये मिळणार

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी जागा खरेदीसाठी सद्य:स्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनंेतर्गत ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य मिळते. एवढ्या कमी पैशांमध्ये जागा मिळणे शक्य नसल्याचे सर्व आमदारांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडले आहे. ही रक्कम १ लाख रुपये करणार असून, १५ दिवसांत त्याबाबत शासन निर्णय घेणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

अमृत महाआवास अभियानांतर्गत जिल्हा नियोजन भवनात आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत मंत्री पाटील बोलत होते. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, चंद्रकांत पाटील, मंगेश चव्हाण, प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.पंकज आशिया उपस्थित होेते. ग्रामविकास विभागाची जिल्ह्यातील रिक्त पदे भरावी यासह तीन सूचना मंत्री पाटील यांनी ग्रामविकास विभागाला केल्या.

मंत्र्यांची गावे असली तरी दुर्दैवाने हगणदारीमुक्ती नाही
३१ मार्चपर्यंत घरकुले पूर्ण करायची आहे. घाईत गुणवत्ता टिकणार नाही, याची काळजी घ्या, घरकुलांसाठी जागेचा विषय येता कामा नये, अशा सूचना ग्रामविकासमंत्री महाजन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात मंत्र्यांची गावे असूनही दुर्दैवाने हगणदारीमुक्ती झाली नसल्याचे सांगावे लागते. गावांची वाईट अवस्था दिसते. त्याशिवाय स्वच्छ भारत अभियान यशस्वी कसे होणार, असा प्रश्नही त्यांनी कार्यशाळेत उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...