आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश‎ प्रक्रिया:अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना‎ अभ्यासासाठी एकच महिना‎

जळगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ डिप्लोमा करुन अभियांत्रिकीच्या‎ थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या‎ विद्यार्थ्यांना यंदा पहिल्या सत्राचा‎ अभ्यास करण्यासाठी केवळ एक‎ महिना वेळ मिळणार आहे.‎ तंत्रशिक्षण संचालनालयाकडून‎ प्रवेश प्रक्रियेस होत असलेल्या‎ विलंबामुळे ही अडचण निर्माण‎ होणार आहे.‎ सध्या अभियांत्रिकीची प्रवेश‎ प्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या फेरीचे‎ अलॉटमेंट दिले गेले आहे. यानंतर‎ आणखी दोन फेऱ्या होणार आहेत.‎

सुमारे २० दिवसांत ही प्रवेश प्रकिया‎ पूर्ण होईल. यांनतर २ डिसेंबरपासून‎ परीक्षांना सुरूवात होणार आहे.‎ प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना‎ परीक्षेसाठी पुरेसा अवधी देण्यात‎ येईल. परंतु, थेट दुसऱ्या वर्षाला‎ प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित‎ बॅचसोबतच परीक्षा द्यावी लागणार‎ आहे. या मुळे त्यांना अभ्यासक्रमास‎ पुरेसा वेळ मिळणार नाही. थेअरी व‎ प्रात्यक्षिक असा दुहेरी अभ्यास‎ त्यांना कमी दिवसांत पूर्ण करुल‎ लगेचच परीक्षेला सामोरे जावे‎ लागणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...