आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नकार्याचा उत्साह:धनुर्मासाचा काळामुळे एक महिना लग्न, उपनयन साेहळ्यांना ब्रेक; 18 जानेवारीपासून पुन्हा मुहूर्त

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोव्हेंबरातील २३ तारखेपासून शुक्र ताऱ्याचा पश्चिम दिशेत उदय झाल्या बरोबरच विवाह, उपनयन संस्कार, गृहप्रवेशासह शुभ कार्यास प्रारंभ झाला होता. २८ नोव्हेंबरला पहिल्या मुहूर्ताने लग्नकार्याचा उत्साह वाढला होता. गर्दीचे सर्व नियम शिथिल झाल्याने मुहूर्तावर वर-वधू पक्षांमध्ये उत्साह दिसून आला. आता या वर्षात डिसेंबरमधील पुढील अंतिम चार मुहूर्तांमध्ये शहरात २५० पेक्षा अधिक लग्नकार्य होणार आहेत. यानंतर मात्र धनुर्मासाच्या काळामुळे एक महिन्याचा ब्रेक असणार आहे. त्यानंतर पुढील वर्षात जानेवारीच्या मध्यंतरानंतर लग्न मुहूर्तांची सुरुवात हाेणार आहे.

पुरोहितांच्या म्हणण्यानुसार १७ डिसेंबरपासून धनुर्मासारंभास सुरुवात होणार आहे. त्यामुळे लग्नकार्यास एक महिन्याचा ब्रेक लागणार असल्याचे सांगण्यात आले. १५ जानेवारी २०२३ पर्यंत ही स्थिती असणार आहे. जेव्हा सूर्य धनुराशीत असतो, त्याकाळात विवाह कार्य केले जात नसल्याचे संकेत आहेत. १५ जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल, त्यानंतर १८ जानेवारीपासून पुन्हा लग्न मुहूर्त सुरू होतील.

जानेवारी महिन्यात चार मुहूर्त १८ डिसेंबरपर्यंत चार मुहूर्त आहे. त्यानंतर धनुर्मासारंभास सुरुवात होत आहे. १४ जानेवारी मकरराशीपर्यंत हा काळ असणार आहे.१८ जानेवारीपासून पुन्हा शुभ मुहूर्तकाळ सुरू होईल. या धनुर्मासात शुभ मुहूर्त केले जात नसल्याने एक महिन्याचा ब्रेक असणार आहे. त्यानंतर जानेवारीत चार मुहूर्त आहे. - अनंत भालेराव, पुरोहित.

डिसेंबरमध्ये मंगल कार्यालयांची बुकिंग फुल्ल डिसेंबर महिन्यात शिल्लक चार मुहूर्तांसाठी विवाहस्थळांसह बॅण्ड, डीजे, घोडे, बग्गीसह केटरिंग, डेकोरेशन, ब्युटी पार्लर, व्हिडिओ शूटिंग आदींची बुकिंग पूर्ण झाली असल्याचे चित्र आहे. या महिन्यातील मुहूर्तावर नोंदणी पूर्ण झाली असल्याचे टेंट हाऊस असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप श्रीश्रीमाळ यांनी सांगितले. शहरातील १७५ टेंट व्यावसायिकांकडे किमान एक ते दोन कार्याची बुकिंग आहे. एका लग्नकार्यास दोन दिवसांपर्यंत टेंट बुक राहत असून, धनुर्मासापर्यंत बुकिंग फुल्ल झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...