आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन नावनोंदणी सुरू; अकरावीची प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया 5 जुलैपासून सुरू होणार

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे १७ जूनला इयत्ता दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र गुणपत्रक मिळाले नसल्याने शहरातील महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन नावनोंदणी सुरू केली आहे. दरम्यान ४ जुलै रोजी विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार असून, ५ जुलैपासून प्रत्यक्षात प्रवेशाला सुरुवात होणार आहे. यंदा कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या जिल्ह्यात सुमारे ४९ हजार ८० जागा आहेत.

जळगाव जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी २१६ महाविद्यालयांत ४९ हजार ८० जागा उपलब्ध असून, यात अनुदानित महाविद्यालयांमध्ये २९ हजार ३२०, विना अनुदानित ५२ महाविद्यालयांत १६ हजार ९६० तर स्वयंअर्थसाहाय्य असलेल्या १९ महाविद्यालयांत २८०० जागा उपलब्ध आहेत. ४ जुलैला सकाळी ११ वाजता शाळांना गुणपत्रक वितरित करण्यात येणार असून, याच दिवशी दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रकाचे वाटप करण्यात येणार आहे. गुणपत्रक हाती पडल्यानंतर ५ जुलैपासून प्रत्यक्षात प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार आहे.