आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन फसवणूक:क्रेडिटकार्डमध्ये बदल करायचे सांगत शिक्षकाला 25 हजारांचा गंडा; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रेडिटकार्ड डोमेस्टीक किंवा इंटरनॅशनल असे कनव्हर्ट करायच्या नावाने भामट्याने एका शिक्षकास फोन करुन 25 हजार रुपयात ऑनलाइन फसवणूक केली. या प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. नीलेश कवडू क्षीरसागर (वय 33, रा. संघवी कॉलनी, पाचोरा) यांची फसवणूक झाली आहे. नीलेश हे शिक्षक आहेत.

घटना अशी की, 10 जून रोजी नीलेश यांना एका क्रमाकांवरुन अनोळखी व्यक्तीचा फोन आला. ‘तुमचे क्रेडिटकार्ड डोमेस्टीक किंवा इंटरनॅशनल असे कनव्हर्ट करायचे आहे, त्यासाठी तुम्हाला एक ओटीपी पाठवला आहे, तो मला सांगा’असे बाोलून भामट्याने नीलेश यांना विश्वासात घेतले. त्याच्यावर विश्वास ठेऊन नीलेश यांनी ओटीपी सांगितला.

यानंतर काही वेळातच नीलेश यांच्या बँक खात्यातून 25 हजार रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वर्ग झाल्याचा मेसेज त्यांना मिळाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्याची चौकशी केल्यानंतर सोमवारी पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाइल क्रमांक धारकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेड कॉन्स्टेबल भगवान बडगुजर तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...