आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Currency Band Latets Update | Online Banking | Online Fraud Increased By 87% After Demonetisation; 505 Crore Lime, 9,103 Cases Of Bank related Fraud

दिव्य मराठी विश्लेषण:नोटबंदीनंतर 87% वाढली ऑनलाइन फसवणूक; 505 काेटींचा चुना, बँकेशी संबंधित 9,103 फसवणुकीच्या घटना

प्रदीप राजपूत | जळगाव7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात बँक ग्राहकांच्या कार्ड, इंटरनेटद्वारे आर्थिक फसवणुकीच्या घटना ५ वर्षांत म्हणजे नोटबंदीनंतर ८६.५१ टक्क्यांनी वाढल्या. यात ग्राहकांना एकूण ५०५ कोटी रुपयांचा फटका बसला. गेल्या वर्षभरातच अशा ३,५९६ तक्रारी पुढे आल्या असून ई-ठगांनी ग्राहकांचे १५५ काेटी रुपये लांबवल्याचे आरबीआयच्या अहवालातून समाेर आले आहे. बँकिंगसंबंधित अन्य फसवणुकीच्या तुलनेत ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण ३९.५ टक्के वाढले आहे.

गेल्या ५ वर्षांत फाेनवर एटीएमचा पासवर्ड, ओटीपी विचारून पैसे लांबवणे, इंटरनेटद्वारे लिंक पाठवून ग्राहकांचे बँक खाते रिकामे करणे अशा ११,१६९ घटना घडल्या. यातून ग्राहकांच्या खात्यातून ५०५ काेटी रुपये काढून घेण्यात आले आहेत. २०१७-१८ या वर्षात ३१ काेटी रुपयांची फसवणूक झाली हाेती. २०२१-२२ या वर्षात ग्राहकांना १५५ काेटी रुपयांचा ऑनलाइन गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात बँकांकडून ग्राहकांना अपेक्षित सहकार्य मिळत नसून या तक्रारी पाेलिसांकडे चाैकशीसाठी प्रलंबित आहेत.

रकमेत सार्वजनिक बँका जास्त डिजिटल बँकिंगमध्ये आघाडीवरील खासगी बँका फसवणुकीच्या घटनांमध्येही पुढे आहेत. वर्षभरात फसवणुकीच्या ९,१०३ तक्रारींपैकी ५,३३४ तक्रारी (५८.६%) खासगी बँकेच्या आहेत. यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकेशी संबंधित घटना ३,०७८ (३३.८%) आहेत. फसवणुकीच्या ६० हजार ४१४ काेटींच्या रकमेत ६६.७% वाटा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा आहे. या बँकांमध्ये ४० हजार २८२ काेटी रुपयांची फसवणूक झाली आहे. खासगी बँकांतील फसवणुकीचा आकडा १७ हजार ५८८ काेटी रुपये इतका आहे.

बँकनिहाय फसवणुकीचे प्रमाण

वित्तीय संस्था 0.1% पेमेंट बँका 0.3% लहान वित्तीय 1.7% विदेशी बँका 5.5%

२०२१-२२ मध्ये वाढली ई-फसवणूक २०२१-२२ मध्ये ९,१०३ फसवणुकीच्या घटना झाल्या. यात फसवणुकीची एकूण रक्कम ६०,४१४ काेटी आहे. यात सर्वाधिक रक्कम ५८,३२८ काेटी कर्जाशी, तर ऑनलाइन फसवणुकीची रक्कम १५५ काेटी आहे.

बँकेशी संबंधित तक्रारींची टक्केवारी कर्ज 42.2% कार्ड/इंटरनेट 39.5% ठेवी 5.2% चेक/डीडी 2.2% कॅश 7.1% बॅलन्सशीट 0.2% क्लिअरिंग 0.2% फाॅरेन एक्स्चेंज 0.1% इतर 3.3%

बातम्या आणखी आहेत...