आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचीत्र प्रकार:तरुणाच्या नावाने महिलांच्या अंतर्वस्त्रांची ऑनलाइन खरेदी ; जामनेरातील प्रकार, मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न

जळगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर येथे राहणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणास मानसिक त्रास देण्यासाठी एका व्यक्तीने विचित्र प्रकार अवलंबला. हा व्यक्ती थेट तरुणाचा बनावट ई-मेल आयडी तयार करुन त्या माध्यमातून विविध अॉनलाइन शॉपींग अॅपवर महिलांचे अंतर्वस्त्र खरेदी करतो आहे. कॅश ऑन डिलिव्हरीसाठी तरुणाच्या घराचा पत्ता देतो आहे. त्यामुळे तरुणाच्या घरी डिलेव्हरी बॉय येत आहेत. काही वस्तू सोडवल्या असता त्यात अंतर्वस्त्र मिळून आली. जी तरुणाने ऑर्डर केलेली नव्हती. सहा जून रोजी पहिले पार्सल तरुणाच्या घरी आले. यानंतर दररोज एक-दोन पार्सल येऊ लागले. या प्रत्येेक पार्सलमध्ये महिलांचे अंतर्वस्त्र असल्याने तरुणासह त्याचे कुटंुबीय चकीत झाले. आपण कोणत्याही प्रकारची ऑनलाइन खरेदी करीत नसताना पार्सल काय येत आहेत? याचा तपास तरुणाने घेतला. या वेळी त्याच्या नावाचा बनावट ई-मेल आयडीवरुन कुणीतरी हा खोडसाळपणा करीत असल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे तरुणाने मंगळवारी सायबर पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार बनावट ई-मेल तयार करणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...