आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राउंड रिपाेर्ट:गणेश काॅलनी ते काेर्ट 1300 मीटर रस्त्याचे अडीच महिन्यांत झाले फक्त 20 टक्के काम

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विकासाची कामे अत्यंत धिम्या गतीने सुरू आहेत. नागरिकांना दरराेज त्रास सहन करावा लागताेय. पण लाेकप्रतिनिधींसह प्रशासनाला त्याची काेणतीही घाई नसल्याचे गणेश काॅलनी मार्गावरून दिसते. १३०० मीटर लांबीच्या रस्त्याचे काम सुरू हाेऊन अडीच महिना लाेटला. मात्र अजूनही काम २० टक्क्यांच्या पुढे सरकलेले नसल्याची वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहणीत समाेर आली. प्रशासन मात्र ५ डिसेंबरपर्यंत रस्ता चकाचक हाेईल, असा दावा करीत आहे.

शहरातील विकासाची कामे अत्यंत धिम्या गतीने सुरू आहेत. नागरिकांना दरराेज त्रास सहन करावा लागताेय. पण लाेकप्रतिनिधींसह प्रशासनाला त्याची काेणतीही घाई नसल्याचे गणेश काॅलनी मार्गावरून दिसते. १३०० मीटर लांबीच्या रस्त्याचे काम सुरू हाेऊन अडीच महिना लाेटला. मात्र अजूनही काम २० टक्क्यांच्या पुढे सरकलेले नसल्याची वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहणीत समाेर आली. प्रशासन मात्र ५ डिसेंबरपर्यंत रस्ता चकाचक हाेईल, असा दावा करीत आहे.पिंप्राळा, निमखेडी, खाेटेनगर, शिवकाॅलनी, आशाबाबानगर, भाेईटेनगरपासून सुमारे दाेन लाखांपेक्षा जास्त लाेकसंख्येसाठी दळणवळणाचा सुरक्षित मार्ग म्हणून गणेश काॅलनी ते काेर्ट रस्त्याकडे पाहिले जाते; परंतु नागरिकांसाठी महत्त्वाच्या या मार्गाची गेल्या काही वर्षांत प्रचंड दैना झाली आहे.

गणेश काॅलनी रस्ता ७० मिमी उंच हाेईल
गणेश काॅलनी ते काेर्ट या रस्त्याचा बेस तयार असल्याने अंदाजपत्रकानुसार एमपीएम केल्याचे सांगितले जात आहे. एमपीएम हाेऊन दहा दिवस उलटले आहेत. वास्तविक सातव्या दिवशी डांबर मिश्रित खडी (बीएम) करून कारपेट व सीलकाेट करणे अपेक्षित हाेते. पुढच्या आठवड्यात कामाला सुरुवात हाेऊन रस्त्यांची उंची ७० मिमी वाढणार आहे.

कामात अनेक अडचणी निर्माण झाल्या हाेत्या
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गिरीश सूर्यवंशी यांनी एक किमी रस्त्यासाठी किमान एक महिना लागताे; परंतु गणेश काॅलनीच्या कामात अनेकदा अडचणी आल्या. बीएम, कारपेट व सीलकाेटचे काम पूर्ण हाेण्यासाठी आणखी १५ दिवस लागणार असून, ५ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचा दावा त्यांनी केला आहे.

तीन वर्षांपूर्वीच्या कार्यादेशामुळे अडचण
४२ काेटींच्या कामांची यादी महापालिकेने दिली असली तरी अंदाजपत्रक मात्र सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झाले आहे. या कामांवर बांधकाम विभागाचेच नियंत्रण आहे. ४२ काेटींच्या कामासाठी ३१ डिसेंबर २०१९ राेजी कार्यादेश दिले हाेते. त्यानंतर ३० महिन्यांनी कामावरील स्थगिती उठवल्याने कामांना उशीर झाला आहे. हा वेळ भरून काढण्यासाठी आता माेठी कसरत करावी लागणार असल्याचे दिसते आहे.

बातम्या आणखी आहेत...