आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात सर्वाधिक साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते. त्यासाठी कापसाच्या बियाणे मागणीच्या तुलने 67 टक्केच उपलब्ध आहेत. तशीच काहीशी स्थिती साेयाबीन या प्रमुख पिकाबाबत आहे. साेयाबीनचे बियाणेदेखील फक्त 63 टक्केच बाजारापेठेत 2 जून अखेर उपलब्ध असल्याचे शासकीय आकडेवारी सांगते.
जिल्ह्यात खरीप हंगामात साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते. त्यासाठी यंदा 27 लाख 50 हजार पाकिटांची मागणी आहे. प्रत्यक्षात 2 जून अखेर ती 18 लाख 34 हजार 370 पाकीटेच उपलब्ध आहेत. म्हणजेच तब्बल 9 लाख 15 हजार 630 बियाणे पाकीट कमी आहेत. जी आहेत ती सर्वच खासगी कंपन्यांची आहेत.
साेयाबीन बियाण्यांचीही तीच स्थिती
साेयाबीन या तेलवर्गीय पिकाची जिल्ह्यात 18 हजार 300 हेक्टर क्षेत्रावर क्षेत्रावर लागवड हाेते. त्यासाठी 13 हजार 727 गाेण्या बियाण्यांची मागणी आहे. तर प्रत्यक्षात 8 हजार 668 गाेण्या बियाणेच उपलब्ध आहे. म्हणजेच 63 टक्केच साेयाबीन बियाणे आजच्या स्थितीत उपलब्ध आहेत. तर बियाण्यांचे 5 हजार 50 गाेण्यांची कमतरता आ
बियाणांचे भाव वाढलेत
गेल्या दाेन वर्षांपासून अवकाळी पावसाने साेयाबीन पिकांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान हाेत आहे. तर काही खासगी कंपन्यांच्या बियाणांची उगवणच झाली नाही. त्यावर कृषी विभागाने संभाव्य बियाणे टंचाईवर शेतकऱ्यांना बियाणे राखून ठेवण्याचे आवाहन केले हाेते. परंतु चार महिन्यांपूर्वी साेयाबीनची जागतिक बाजारपेठेत मागणी वाढल्याने उत्पादनाचे भाव 10 हजाराच्या घरात पाेहचले हाेते. त्यामुळे घरगुती बियाणांचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या साेयाबीनचे भाव 6 हजार ते साडेसहा हजारांपर्यंत खाली आले आहेत. तर बियाणांचे भाव 10 हजारांच्या घरात पाेहाेचले आहेत.
तुर, मुग, उडीदांचे बियाणे तुलनेत बरे
आंतरपीक म्हणून घेतल्या जाणाऱ्या तुर, मूग व उडीद या डाळवर्गीय पिकांची लागवड सातत्याने घटत असली तरी त्यांचे बियाणे बऱ्यापैकी प्रमाणात उपलब्ध आहेत. तुरीचे लागवड क्षेत्र 13 हजार 300 हेक्टर असून त्यासाठी 698 गाेण्यांची मागणी आहे. तर 516 गाेण्या बियाणे उपलब्ध आहे. उदीडाचे क्षेत्र 22 हजार 100 हेक्टर आहे. त्यासाठी 1160 पाकीटांची मागणी आहे. तर उपलब्ध बियाणे 1067 आहेत. मुगाचे क्षेत्र 23 हजार 800 असून बियाणांची मागणी 844 पाकीट असता बियाणे मात्र 583 एवढेच आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.