आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक कर्ज:पीक कर्जाची नियमित परतफेड  केली फक्त 86 हजार शेतकऱ्यांनी ; 2 लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ घेतला.

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतर्गत जिल्ह्यातील १ लाख ६० हजारावर शेतकऱ्यांनी २ लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ घेतला. तुलनेत सन २०१७ ते २०२० या कालावधीत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घेतलेल्या पीक कर्जाची नियमीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा ५० टक्क्यांवर म्हणजेच ८६ हजारावर आहे. हे शेतकरी शासनाच्या निकषानुसार ५० हजार रुपयांच्या अर्थसहाय्यासाठी पात्र ठरु शकणार आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर रोजी थकीत असलेले व १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले २ लाख रुपयांपर्यंतचे अल्प मुदत पीक कर्ज व पुनर्गठीत पीक कर्ज माफ केले. पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अर्थसाहाय्य देण्याचेही शासनाने जाहीर केले होते. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६० हजार ४६० शेतकऱ्यांना ९१५ कोटी ७८ लाख रुपयांची कर्जमुक्ती देण्यात आली आहे. जिल्हा बँकेतर्फे १ लाख ३८ हजार ९०२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ७११ कोटी ८९ लाख २२ हजार रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम आतापर्यंत वर्ग करण्यात आलेली आहे. एकूण ९ हजार ६६७ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास अपात्र ठरवण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना २ लाख रुपयांची कर्जमुक्ती देण्यात आली; मात्र नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अर्थसाहाय्य सरकारकडून देण्यात आले नव्हते. या पार्श्वभूमीवर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याबाबत राज्याचे वित्तमंत्री अजीत पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा जाहीर केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील ८७६ विविध कार्यकारी सोसायटींकडून २०१७ ते २०२० या कालावधीत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या ८६ हजार ७३४ शेतकरी सभासदांची माहिती संकलित करण्यात आली आहे. ही माहिती शासनाला पाठवली आहे.

बातम्या आणखी आहेत...