आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापावसाने उसंत घेताच शिवाजीनगर उड्डाणपुलावर डांबरीकरणाच्या कामाला गती देण्यात आली आहे. डांबरीकरणाचा एक स्तर पूर्ण हाेताच उड्डाण पुलावरून पादचाऱ्यांसह दुचाकी व चारचाकींसाठी मार्ग माेकळा केला जाणार आहे. साेमवारपासून किमान पंधरा दिवस अवजड वाहनांची वाहतूक सुरू केली जाणार नाही. पुढचे दाेन दिवस पाऊस न झाल्यास हे नियाेजन प्रत्यक्षात राबवले जाणार आहे.
शिवाजीनगर व परिसरातील काॅलन्यांतील सुमारे दीड लाख लाेकवस्तीसाठी दळणवळणाचा प्रमुख मार्ग असलेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात पाेहाेचले आहे. पावसामुळे महिनाभर लांबलेले डांबरीकरणाचे काम पावसाने विश्रांती घेताच पूर्ण करण्यावर भर दिला जाताे आहे. दरम्यान, पुलावरून वाहतूक लवकरच सुरू हाेईल. पुलाच्या उर्वरित भागाचे काम सुरू करण्यासंदर्भात मनपा आयुक्त विद्या गायकवाड, आरटीआे श्याम लाेही, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत येळाईत, उपअभियंता सुभाष राऊत, मनपाचे शहर अभियंता एम.जी. गिरगावकर आदींनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता संयुक्त पाहणी केली.
‘टी’ आकाराचे काम सुरू, अतिक्रमण निर्मूलन करणार आयुक्त गायकवाड व अधिकाऱ्यांनी ‘टी’ आकाराच्या पुलाचे काम किती लांबपर्यंत हाेणार याची पाहणी केली. साळुंखे चाैकात पूल उतरणार आहे. त्यामुळे या भागात अतिक्रमण काढावे, अशी सूचना करण्यात आली; परंतु ज्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम सुरू हाेईल त्याच्या दाेन दिवस आधी संपूर्ण अडथळे दूर करू, असे आयुक्तांनी सांगितले.
परवानगीने निर्णय : पावसाने गेली दाेन दिवस विश्रांती घेतल्यास रविवारपर्यंत पुलावरील डांबरीकरणाचे काम पूर्ण करणे शक्य हाेणार आहे. याशिवाय पुलाच्या अन्य कामांनाही वेग दिला आहे. जिल्हाधिकारी अभिजित रोाऊत व रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पुलावरून वाहतुकीचा निर्णय घेतला जाईल. साेमवारपासून वाहतूक सुरू हाेणे शक्य आहे.
उड्डाण पुलावरील डांबरीकरणाचा एक स्तर पूर्ण हाेणार
पुलाचे काम लांबल्याने शिवाजी नगरातील नागरिकांचे हाल हाेत आहेत. लाेक रस्त्यावर उतरू लागले आहेत. त्यामुळे पुलावरून वाहतूक सुरू करण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मक्तेदाराकडून डांबरीकरणाचे काम करण्यावर भर दिला. पुलावर डांबरीकरणाचे दाेन स्तर टाकले जाणार असले तरी सुरुवातीला एका स्तराचे काम पूर्ण हाेताच पादचारी, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पुलावरील वाहतूक सुरू केली जाईल. त्यानंतर यशावकाश डांबरीकरणाच्या दुसऱ्या स्तराचे काम हाेणार आहे. पुलाची काही कामे सुरू आहेत. त्यामुळे अवजड वाहतूक किमान पंधरा दिवस सुरू हाेणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.