आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दखल:खान्देश सेंट्रलचे सर्व रस्ते खुले करा, महापालिकेचा सात दिवसांचा अल्टिमेटम; नागरिकांच्या तक्रारींची दखल

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खान्देश सेंट्रलच्या परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्याचे आदेश असतानाही गेट लावून बंद करण्यात आले आहेत. वाहनधारकांना मज्जाव केला जात असल्याने तक्रारी वाढल्या आहेत. यासंदर्भात पालिकेने जागेची स्थळ पाहणी केल्यानंतर सात दिवसांत सर्व रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेने कारवाई न केल्यास नेहरू चौक व टॉवर चौकात स्वखर्चाने गेट लावण्याचा इशारा अॅड. विजय पाटील यांनी दिला आहे.

रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी खान्देश सेंट्रलच्या आवारातून मार्ग खुला करण्यात आला आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाची भिंत देखील पाडण्यात आली होती. दरम्यान, सुरुवातीला काही दिवस खुला असलेला मार्ग नेहरू चौक व गोविंदा रिक्षा स्टॉपच्या बाजूने गेट लावून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री रेल्वेने जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांना प्रवेश दिला जात नव्हता. यासंदर्भात राष्ट्रवादी अर्बन सेलतर्फे माजी नगरसेविका अश्विनी देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी तक्रारीद्वारे रस्ता मोकळा करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची अॅड. विजय भास्कर पाटील, विनोद देशमुख व कार्यकर्त्यांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. दरम्यान, महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी खान्देश सेंट्रल येथील बंद केलेल्या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यात पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण २४ मीटर रूंदीच्या रस्त्यावर एका बाजूला गेट बंद करून सार्वजनिक वापरासाठी रस्ता बंद केल्याचे आढळून आले. सहायक संचालक अशोक करवंदे यांनी तक्रारीच्या अनुषंगाने सात दिवसांत गेट काढून घेण्याचे तसेच रस्त्याचा सार्वजनिक वापर करता मोकळा मोकळा करण्याचे आदेश दिले आहेत.

अन्यथा, नेहरू चौक, टॉवर रस्ता गेट लावून बंद करू
खान्देश सेंट्रलचे सर्व रस्ते सार्वजनिक वापरासाठी खुले करण्यात आले आहेत. त्यानंतरही इथे गेट लावून वापरण्यासाठी मज्जाव केला जातो. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आता आदेश काढण्यात आले आहेत; परंतु महापालिकेने जर आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केली नाही तर नेहरू चौक व टॉवर चौकात गेट लावून रस्ते वाहतुकीसाठी बंद करू.
- अॅड. विजय भास्कर पाटील, तक्रारदार, जळगाव

बातम्या आणखी आहेत...