आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रव्यवहार:खान्देश मिलचे रस्ते खुले करा; अन्यथा 2.75 काेटी परत द्या

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खान्देश मिल परिसरात संत बाबा हरदासराम मार्केटची उभारणी करण्यात आली आहे. २१० दुकानांची विक्री झाली आहे; परंतु मार्केटमध्ये दुकानदार व ग्राहकांना जाण्यासाठी असलेले दाेन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. रस्ते खासगी जागेत हाेते तर मार्केटची परवानगी का दिली? असा प्रश्न करत रस्ते खुले करा अथवा बेटरमेंट व प्रीमिअमचे पावणेतीन काेटी रुपये परत करा, अशी मागणी के. पी. इन्फ्रास्ट्रक्चरचे खुबचंद साहित्या यांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या नेहरू चाैकापासून हाकेच्या अंतरावर खान्देश मिलच्या जागेत साहित्या यांनी व्यापारी संकुलाची उभारणी केली आहे. यासाठी २ काेटी ७५ लाख ६६ हजार ९०३ रुपये फी स्वरूपात महापालिकेत भरणा केला आहे. त्यानंतरच महापालिकेने परवानगी दिली आहे. आता दुकानांची विक्री झाली असून, व्यवसाय सुरू करण्याची वेळ आली आहे; परंतु मार्केटकडे जाणारे दाेन्ही रस्ते गेट लावून बंद करण्यात आले आहेत. हे दाेन्ही रस्ते खासगी हाेते तर परवानगी कशी दिली असा प्रश्न केला आहे. ब्रिटिशांप्रमाणे हुकूमशाही सुरू असल्याचा आराेप करत जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. प्रशासनाने मार्केटमध्ये दुकाने बुक केलेल्या २१० व्यावसायिकांना रस्ता उपलब्ध करून सुविधा द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...