आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशस्वी:रात्रभराच्या रेकीनंतर 15 मिनिटांत ऑपरेशन अब्दुल झाले यशस्वी

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरातील ‘पीएफआय’च्या पदाधिकाऱ्यांवर ‘एटीएस’ने (दहशतवादीविरोधी पथक) एकाचवेळी छापेमारी करीत १०० हून अधिक जणांना अटक केली. यात जळगावातून अब्दुल हादी अब्दुल रौफ या जालन्यात राहणाऱ्या तरुणास अटक केली आहे. अकोला एटीएसच्या पथकाने बुधवारी रात्रभर रेकी केली. अब्दुल हा अल मन्नान मशिदीत असल्याची पक्की माहिती त्यांना मिळाली होती. त्यानंतर पहाटे ४.३० ते ४.४५ या १५ मिनिटांत एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पथकाच्या मदतीने एटीएसने अब्दुलला अटक करून ‘ऑपरेशन अब्दुल’ सक्सेस केले.

जळगावात बुधवारी रात्रीच अकोला एटीएसचे पोलिस उपनिरीक्षक गौरव सराक यांच्यासह सुमारे १५ जणांचे पथक तीन वाहने, दोन दुचाकींनी जळगाव शहरात दाखल झाले होते. अब्दुल दत्तनगरात असल्याचे लोकेशन पथकाला मिळाले होते. त्या अनुषंगाने या पथकाने रात्रभर रेकी केली. अब्दुलचे लोकेशन कम्फर्म करून पाळत ठेवली. रात्रीच्या वेळी त्याला ताब्यात घेतल्यास परिसरात गोंधळ उडू शकतो. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पथकाने वेट अॅण्ड वॉच केले. पहाटे ४.१५ वाजता एसटीएसचे पथक एमआयडीसी पोलिस ठाण्यात धडकले. ठाणे अंमलदार सचिन पाटील यांना ओळख देऊन स्थानिक पोलिस बंदोबस्त मागितला; परंतु कुठे जायचे आहे? काय करायचे आहे? याबाबत गोपनीयता ठेवली हाेती.

सचिन पाटील यांनी पोलिस निरीक्षक प्रताप शिकारेंना फोन करून माहिती दिली. त्यानुसार सपाेनि प्रमोद वाठोेरे व त्यांचे पथक पोलिस ठाण्यातून निघाले. या वेळी एटीएसचे पथक तीन चारचाकीतून पुढे जात होते. त्या मागे दोन दुचाकीवरून दोन अधिकारी निघाले. मागे एमआयडीसीचे पथक होते. ही सर्व वाहने दत्तनगरात उभी केली. तेथून सुमारे ५० ते ६० मीटर अंतरावर निमुळत्या गल्लीत अल मन्नान मशीद आहे. पथक मशिदीबाहेर पोहोचताच एटीएसच्या अधिकाऱ्याने ‘एक जण आला आहे, तो आत आहे का बघा’ असे आदेश देत चार कर्मचारी आत पाठवले. तेव्हा खालच्या मजल्यावर एक व्यक्ती साफसफाईचे काम करीत होता. त्याला विचारणा केली असता ‘एक जण आला आहे रात्री, तो वर झोपला आहे’ असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यानुसार पथक वरच्या मजल्यावर गेले. तेथे एकूण तीन जण झोपले होते. या तिघांना पोलिसांनी झोपेतून उठवल्याने ते गोंधळले ‘क्या हुआ, कोण है’ असे प्रश्न त्यांनी पोलिसांना विचारले. चाैकशीनंतर दोघांना सोडून देण्यात आले तर अब्दुलला एसटीएसचे पथक औरंगाबाद येथे घेऊन गेले.

अब्दुलच्या पत्नीस दिली माहिती
गुरुवारी सकाळी ७ वाजता एटीएसच्या पथकाने अब्दुलची पत्नी उजमा यांना मोबाइलवर फोन करून अब्दुलला एका गुन्ह्यात ताब्यात घेतले असून, चौकशीसाठी औरंगाबाद येथे घेऊन जात असल्याची माहिती दिली. दरम्यान, ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने अब्दुलच्या पत्नीस संपर्क केला असता, अब्दुल बुधवारी सकाळी ११ वाजता घरातून बाहेर पडल्याची माहिती मिळाली. ताे ट्रान्स्पोर्ट लाइनमध्ये काम करत असल्याने तो दोन-तीन दिवस घराबाहेर राहतो. कामाबद्दल घरी जास्त चर्चा करत नाही. त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचेही माहीत नाही, असेही उजमा यांनी सांगितले.

हल्ल्याची शक्यता; पिस्तुलांसह तैनात हाेते पथक
अब्दुलला ताब्यात घेताना काही गैरप्रकार होऊ शकतो. पोलिसांवर हल्ला होऊ शकतो ही शक्यता गृहीत धरून एटीएसचे पथक पिस्तुलांसह तैनात होते. मशिदीमध्ये जात असताना सर्व अधिकारी, कर्मचारी सतर्क होते.

बातम्या आणखी आहेत...