आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये अभियांत्रिकी (बी.ई), औषधनिर्माणशास्त्र (बी. फार्मसी) आणि कृषी या पदवी शिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी सीईटी परीक्षा आवश्यक असते. या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी संयुक्तरीत्या एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली जाते. जेईई मेनच्या पहिल्या सत्रातील परीक्षा १६ ते २१ एप्रिल दरम्यान तर दुसऱ्या सत्रातील परीक्षा २४ ते २९ मे या कालावधीत होणार आहेत. या परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३च्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जात असून, या वर्षी विद्यार्थ्यांना दोन संधी उपलब्ध असणार आहेत. संगणकावर आधारित (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) असलेल्या या परीक्षेच्या रचनेचाही तपशील प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक सत्रासाठी केवळ एक अर्ज भरायचा आहे. एकापेक्षा जास्त अर्ज स्वीकारले जाणार नाही. विद्यार्थ्यांना www.mahacet.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी करावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.