आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताैक्ते पाहणी दाैरा:कोविडची लढाई संपल्यावर राज्यातील सत्तांतराकडे लक्ष घालू : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

रावेर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्ताईनगर शिवारात नुकसानग्रस्त केळीची शेतकऱ्यांसोबत पाहणी करताना देवेंद्र फडणवीस. - Divya Marathi
मुक्ताईनगर शिवारात नुकसानग्रस्त केळीची शेतकऱ्यांसोबत पाहणी करताना देवेंद्र फडणवीस.
  • आघाडी सरकारलाच आहे डॅमेज कंट्रोलची गरज

राज्यात सध्या कोविडची स्थिती आहे. त्यामुळे राजकीय सत्तांतराकडे आमचे लक्ष नाही. मात्र, एकदा कोविडची लढाई संपली की सत्तांतराकडे लक्ष घालू, असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तांदलवाडी (ता.रावेर) येथे केले. फडणवीस यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीचा नेमका अर्थ काय? सत्तांतराचे काही संकेत आहेत का? याबाबत ‘दिव्य मराठी’ने प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी वरील उत्तर दिले. तसेच आम्हाला डॅमेज कंट्रोलची आवश्यकता नाही. ज्यांचे होते त्याने ते करावे. आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत स्वतःच्या पूर्वीच्या मागणीची ठाकरे, पवारांनी पूर्तता करावी, असा टोला हाणला.

संजय राऊत यांच्यावर टीका : शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर टीका करताना, राऊत यांची अवस्था ‘घर का ना घाट का’ अशी झाली आहे. सध्या रोज उठून बोलण्याशिवाय त्यांच्याकडे काहीही काम नाही. कोणी लक्ष देत नसेल तर लक्ष वेधून घेण्यासाठी ते बोलतात, असा टोला लगावला.

त्यांच्या मागणीची त्यांनीच पूर्तता करावी : . या शेतकऱ्यांना सरकारने तत्काळ मदत करावी, अशी मागणी सरकारकडे करणार आहे. सरकारने किती मदत करावी, याची मागणी आपण करणार नसून २०१९ मध्ये भाजपचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी हेक्टरी ५० हजार, तर अजित पवार यांनी हेक्टरी १ लाख रुपये मदत देण्याची मागणी केली होती. आता त्यांच्या मागणीची त्यांनीच पूर्तता करावी, असे फडणवीस म्हणाले.

खडसेंच्या कोथळीतील निवासस्थानाला भेट
फडणवीस यांनी ाष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कोथळीतील ‘मुक्ताई’ निवासस्थानी भेट दिली. या वेळी पत्रकारांनी खडसेंच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीबद्दल विचारले असता, फडणवीस म्हणाले, रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात आल्याने त्यांच्याकडे चहापानासाठी गेलो होतो. यात कुणीही वावगे समजू नये.

विमा कंपनीबाबत शेतकऱ्यांनी केल्या तक्रारी
पीक विमा कंपनीचे लोक अद्यापही नुकसान झालेल्या अनेक ठिकाणी पोहचले नाहीत. काही ठिकाणी १०० टक्के नुकसान होऊनही विमा कंपनीचे प्रतिनिधी ६० टक्के नुकसान दाखवत आहेत. पैशांची मागणी केल्यावर ८० टक्के नुकसान दाखवत असल्याची तक्रार फडणवीस यांच्याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...