आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा:सार्वजनिक विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा

जळगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यातर्फे वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागुल होते. तालुका समन्वयक कल्पना बेलसरे, के. एस. कलंत्री, कमलेश मुळे उपस्थित होते.

स्पर्धेचे विषय ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जीवनकार्य, लोकसाहित्य, कामगार चळवळ व योगदान’ हे होते. प्रास्ताविक गोपाळ महाजन यांनी केले. सूत्रसंचालन भारती पाटील केले. परीक्षक म्हणून के. बी. तायडे, उषा नेमाडे यांनी काम पाहिले. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...