आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबसच्या धडकेत १५ ठिकाणी पाय फ्रॅक्चर होऊन अपंगत्व आलेल्या एका महिला होमगार्डला जळगाव आगाराने साडेसात लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात न्यायालयाने दिले. घटन अशी की, अंजना शिवाजी गायकवाड (रा. कुंभार गल्ली, जामनेर) यांचा २६ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता जामनेरात अपघात झाला होता. गायकवाड यांच्या पायावरून भरधाव एसटी बस (एमएच २० बीएल ३३६२) गेली.
या अपघातात त्यांचा पाय ३८ टक्के कायमस्वरूपी निकामी झाला. गायकवाड यांच्या फिर्यादीवरून बसचालक सोपान श्रीराम थाटे (रा. केकतनिंभोरा ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांनी मोटार अपघात न्यायालयात नुकसान भरपाईसाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी झाली. अपघातात झालेले नुकसान, सिव्हिल सर्जन यांचे अपंगत्वाबाबतचे प्रमाणपत्र तसेच गायकवाड यांच्याकडून अॅड. महेंद्र सोमा चौधरी यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.