आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एगॉन लाइफ ग्रुप टर्म प्लस कंपनीला ग्राहक मंचचा दणका:नाकारलेला 10 लाखांचा विमा, 15 हजार रुपये विमाधारकांच्या कुटुंबाला देण्याचे आदेश

जळगाव5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा लाख रुपयांची विमा पॉलिसीचे कव्हरेज असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. यांनतर संबधित कंपनीने विम्याची दहा लाखांची रक्कम देण्यास नकार दिल्याने मृताच्या आईने ग्राहक मंचात धाव घेतली. सुनावणीअंती ग्राहक मंचाने संबधित कंपनीला 10 लाख रुपयांचा विमा, तक्रारदारास मानसिक त्रासापोटी 10 हजार व अर्जाच्या खर्चापोटी आलेला 5 हजार रुपयांचा खर्च महिन्याच्या आत द्यावा, असे आदेश मंगळवारी दिले.

उषा शांताराम निकम (वय 55, रा. चिनावल, ता. रावेर) यांनी या संदर्भात अर्ज केला होता. सोनवणे यांचा मुलगा चंद्रकांत शांताराम निकम याने एगॉन लाइफ ग्रुप टर्म प्लस कंपनीचा इन्शुरन्स घेतला होता. 1 हजार 495 रुपये मासिक हप्ता नियमित भरत होता. 22 फेब्रुवारी 2020 रोजी चंद्रकांत यांचे हृदयविकाराने निधन झाले. यानंतर उषा निकम यांनी संबधित कंपनीकडे विम्याची रक्कम मागीतली होती. परंतु, त्यांनी काहीही ठोस कारण न सांगत विमा देण्यास नकार दिला. यामुळे निकम यांनी ग्राहक मंचात धाव घेतली.

अध्यक्षा पूनम मलिक व सदस्य सुरेश जाधव यांच्या समक्ष या प्रकरणाची सुनावणी झाली. या विमा कंपनीने विमा नकारण्याचे कारण, कागदपत्रेच सादर केली नाहीत. या उलट निकम यांनी मृत्यूचे कारण, विम्याचे मासिक हप्ते भरल्याच्या पावत्या, डॉक्टरांचा अहवाल असे ठोस कागदपत्र सादर केले. सुनावणीअंती ग्राहक मंचाने निकम यांचा अर्ज मान्य केला. तीस दिवसांच्या आत संबधित कंपनीने विम्याची रक्कम द्यावी असे आदेश केले आहेत. निकम यांच्यातर्फे विधिज्ञ विजय आर. महाजन यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...